कथेचा पूर्ण आत्मा असलेले लेखन आहे हे...विलाक्ष्ण ताकदीचे.
ढग – विनया पिंपळे
पूर्वी कधीतरी तुझ्या पुसटश्या विजेरी स्पर्शाने झणाणून टाकलेला माझा देह- मी सावरून ठेवला होता माझ्या नीटनेटक्या संकोचात
नंतर कधीतरी तुझ्या सोबतीला तू वादळ घेऊन आलास अन् अस्ताव्यस्त केलेस माझ्या संकोचाचे नीटस तुकडे
त्यावेळी तुझी अख्खी वीज माझ्या अंगांगभर लखलखली होती आता तू निरभ्र आहेस मात्र अजूनही माझ्यासोबत उरलेयत काही सैरभैर ढग रोज रात्री पाऊस होऊन कागदावर उतरणारे