सुषमाच्या अलीकडच्या तीन कथा...म्हणजे एक वेगळ्याच सुषमाची ओळख आहे..लिहिल्यावर तिला आनंद होत आहे..आणि हे मला महत्वाचे वाटते.ह्यातला शेवटचा अं??? किती बोलका आहे आणि महत्वाचा आहे....हे मी जाणू शकतो.
शाप – सुषमा जायभाये
बारामहीने तेरा काळ शहराच्या गलीच्छ सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर, पिंजारलेल्या केसांच्या बटा अन् दाढी वाढवून, पाण्याच्या बाँटल, कचरा कुंडीतल्या पत्र्याचे डबे, खीळे-मोळे, लाकडं, रंगीत काचा, फाटक्या गलिच्छ पिशव्यातून ढिगभर लोंबकळणाऱ्या चिंध्या जमा करून काही डोक्यावर काही अंगावर पांघरूण हाताच्या बोटांवर आकडेमोड करत एकाच जागी वर्षानुवर्षे असलेला गोंद्या.
गल्ली गल्लीतून रस्त्यावर टक्क उन्हात अनवाणी पायांनी, अंग झाकण्यापुरता कपडा कमरेला बांधून डोक्यावर मोठ बोचक घेऊन, स्वतःशीच बोलत,मधेच हातवारे करून शिव्या देत, स्वतःभोवतीच एक फेरी मारून, उजव्या हाताच्या दोन बोटांनी डाव्या हातावर थूंक लावून, बोटांवर हिशोब करत आकाशाकडे बोट दाखवत जाणारी कळकट सलमा..
दुःख भोगाव लागण हे भागधेय असत अस ओरडत, चार कवड्या पुन्हापुन्हा मोजून खिशात टाकणारा पांढऱ्या केसांचा शाळे जवळचा वेडा म्हातारा.
लहानपणी पासून हे दृष्य तसंच आहे पण....
नक्की कुठल्या जन्माचे हिशोब चुकल्यामुळे यांच्या वेडाला एवढ्या चिरतारूण्याचा शाप भेटत असेल...अं??