एका मनोवस्थेची लघुतम कथा...सुंदर...
मेघ आणि मन - श्रद्धा चौधरी–शल्हाळकर
रोज भरून येणाऱ्या आभाळाप्रमाणे आजही तिचं मन भरून आलं. अवेळी दाटलेल्या मेघाप्रमाणे तिच्या मनालाही कळेना की आता नेमकं साठवावं की बरसावं? साचल तर मेघाला त्रास आणि अवेळी धुव्वाधार बरसलं तर धरणीवरील सूक्ष्म जिवाला त्रास....एक दोनदा प्रयत्न करून तिने गर्जणाऱ्या मेघांप्रमाणे आसपास हितगुज करून पाहिलं..पण प्रतिसाद शून्य....शेवटी कुंद, अंधारून आलेल्या वातावरणातील मेघासारख्या स्थितीत असलेल्या तिच्या मनाने मुक्त व्हायचं ठरवलं आणि तो मेघ आणि तिचं मन बरसून मोकळे झाले...
कसल्याही परिणामांची पर्वा न करता...