नात्यात हे टाळता येतं...पण त्या साठी एक विश्वास हवा..मोकळेपणा हवा..श्वास घेता आला पाहिजे
निरोप-सोनाली कुलकर्णी
तो अन् ती दोघ एकमेकांच्या प्रेमात हरवलेले..तो तिची काळजी घ्यायचा. तिला हव तस वागायचा, तिची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करायचा. ती त्याच्या ह्या प्रेमळ, गोड स्वभावामुळे त्याच्यात गुंततच गेली. स्वतःच अस्तित्वच हरवून बसली. स्वतःपेक्षाही त्याच्यावर जास्त प्रेम करु लागली. त्याच्यावर सतत नजर ठेऊन रहायला लागली. सतत तो आपल्या सोबत असावा फक्त आपल्याशीच बोलाव असे तिला वाटू लागले. दिवसेनंदिवस त्याच्या बाबतीत पझेसिव्ह व्हायला लागली.
पण तिच्या ह्या अतिप्रेमामुळे तो माञ कंटाळला. निशब्द होऊ लागला.
त्याने एक दिवस तिला सांगून टाकल,
”आता माझ तुझ्यावर प्रेम नाहीये. मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही”
तिला समजेनासे झाले, तिला आधी चेष्टा वाटली. पण दिवसेंनदिवस त्याच्या वागण्यातला बदल तिला सहन होईना. ती खुप रडायची, तो परत बदलावा म्हणून आटापिटा करायची, पण तो पुन्हा पाहिल्यासारखा कधीच नाही वागला.
तो अस् वागण्या मागच तिला कारणही सांगेना..
तो तिला फक्त म्हणे,
”तू खूप चांगलीच आहेस ,पण आपल्यात पूर्वीसारख काहीच नात राहील नाहीये”
ती फक्त रडत होती....तिच्या विचारांच्या,कल्पनेच्या पलिकडे सार काही घडत होत...
"असे का घडत आहे ?"
याच विचारात बुडून गेली..
तिला मग समजून चुकल...
“हातातली वाळू हातात घट्ट पकडावी तर, ती हातातून निसटून जातेच.”
“फुलपाखराला मुठीत धरुन ठेवल तर ते गुदमरुन मरतच ना....”
तसच काहीस आपल्याही नात्याच झाल असाव.
अन् ती शेवटचा निरोप घ्यायला त्याच्याजवळ गेली.
पण त्याने तिला दूरुनच पाहून रस्ता बदलला.