काय वाक्य आहे.."उगाच लग्न करून या प्रेमाला पूर्णविराम नाही द्यायचा मला."
सल – नफिसा सय्यद
मला तुझ्याशी लग्न करणं शक्य नाहीच ग. आपले धर्म वेगळी राहणीमन वेगळे. माझ्या घरी तुला कधी स्वीकारणारच नाही.
मला नाहीच करायचंय रे लग्न. जेव्हा तू भेटलास ना तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण विरघळून जाते मी तुझ्या प्रेमात, तुझ्या अंतरंगात. पाण्याने रंगून जावे रंगात जसं. ते प्रत्येक भेटीत होत. भले मग तू बाकावर माझ्या मांडीत डोकं ठेवून किती शांत वाटतंय म्हणतोस तेव्हा....मी लटकेच चिडली की माझ्या मागे मागे करतोस तेव्हा...तुझ्यासोबत टेकडीवर शर्यत लावते तेव्हा...अन त्या पार्कात पायाने पायला शिवायचा खेळ खेळतो तेव्हा....तुझ्या मिठीत विरघळताना डोळे बंद होतात ना तेव्हा वाटतं,
"बस दो जिस्म एक जान हे हम..."
एका वळणावर विभक्त होऊ. पुढच्या भेटीला नव्याने फक्त मैत्री राहील.
उगाच लग्न करून या प्रेमाला पूर्णविराम नाही द्यायचा मला.
मनात जपायचं तुला.
तुझ्याबाबतीत एकही सल न ठेवता....