शिल्पा गडमडे खुप दिवसानी पुन्हा एकदा....देर से आये लेकिन दुरुस्त आये....
प्रश्न – शिल्पा गडमडे
तिच्या कथेतील पात्र जिवंत होऊन तिच्यासमोर येत विचारतं,
‘का गं माझ्या वाट्याला फक्त दु:खच लिहिते आहेस.. तुझी घटकाभाराची करमणूक होते पण माझं सगळं जगणं पणाला लागतंय लढता लढता’..
तिने त्या पात्राकडे पाहिलं.. एक दीर्घ उसासा टाकून ती आभाळाकडे हात दाखवत म्हणाली,
'मी देखील कधीचा हाच प्रश्न त्याला विचारते आहे'.