नाते ---- "ना"ते....कशी व्याख्या करावी? काही नसून असतात...आणि काही असून नसतात...
रक्ताचं नातं – मेघा संगम पारडीकर
वारंवार फोन करुनही घरचे कोणीच आले नाही.
हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर, रक्ताच्या नात्यातला कोणीतरी आवश्यक आहे म्हणाले सोबत!
आणि आज..........
"शेवटी दर्भाचा कावळा करावा लागला. काहीतरी इच्छा ....."
सांगत होता त्याचा दादा .
काहीतरी ?
त्याच्या जगण्याच्याच इच्छेआड आलं होतं ,
रक्ताचं नातं !