Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

कॉफी–सुवर्णा पावडे

$
0
0

ही कथा म्हणजे कविता आहे...आणि म्हणून मी तशीच पोस्ट करतोय...एका हळव्या मनाची स्थिती आहे ही...सुवर्णा तुला किती शाबासकी देऊ? मी नुक्कड T.V.करीत असतो...तर ही कथा निश्चित केली असती.

कॉफी – सुवर्णा पावडे

सकाळी उठतो तो....

"आज सुट्टी "असं म्हणतो....

मी आपली लगेच आवरते ..सावरते....

थोडसं मनातून मोहरते.....

तो मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा करतो...

दहा -पंधरा मिनिटं जातात त्यात....

मग फर्माईश करतो....

"चलो एकेक कप कॉफी"...

आरे काय मस्त ..."कॉफी विद ..."ओ वाऊ...

मस्त तोऱ्यात चालत जाते मी किचन मध्ये....

कॉफी साठी दुध गरम करते...

तितक्यात आवाज येतो...."सायेब , हाये का घरी?"

सायेब हसत स्वागत करतात...."आरे या..या...."

इकडे कपात कॉफी तयार...

ती आणि मी दोघही वाट बघतो....

"कॉफी घेवू मस्त"...सायेब आलेल्या पाहुण्याला म्हणतात...

पाहुणा म्हणतो...."आरे नाही..चहा चालल आर्धा कप..."

मी स्पष्ट ऐकते...आणि चहाच भांड ग्यास वर ठेवते...

बाहेर दोन कप चहा पाठवते...

सायेब पाहुण्याबरोबर चहा पिऊन घेतात....

पाहुणा निघून जातो सायेब कॉफीच्या मगाकडे बघून...

"आरे , आता चहा झाला ".असं म्हणतात...

मी नाकातून गरम हवेचा सुस्कारा सोडते...

सायेब पुन्हा बाजूला घेतात...

पुन्हा बोलायला सुरुवात होते...

काल न खरच तुला म्हणावं वाटत होत...

मी विचारते.."काय"....

सायेब सुरुवात करतात..."आय.............

आणि मोबाईल वाजतो...........

इतकी जीवावर येते...

'अवेळी मोबाईल करणाऱ्याच्या आयचा घो'.......मनात म्हणते...

'त्याच्या आयला'..... असंही म्हणते....

थोडसच अंतर राहील होत ".........यु" पर्यंत पोचायचं...हेत...

सायबांच मोबाईल वर बोलून होत...

मग पुन्हा सायेब म्हणतात ....

"सन्ध्याकाळी कॉफी घेवू...सकाळी चुकलेली..."

मी पुन्हा माझ्या काळ्या ढगाला....सिल्वर लायनिंग देते..

शाळेत मधल्या सुटीत ..

सायेबांचे एसेमेस येतात...दोन चार....

शाळा सुटते.....मी लगबगीने घरी येते ....

...... येस्स ..कॉफी विद..........

घरी आल्याबरोबर सगळीकडे बघते दिसत नाहीत...

पोर सांगतात ....".आजीला देवळात घेवून गेलेत बाबा....."

आरे नो प्रॉब्लेम.....

मी पुन्हा आवरून- सावरून घेते ....

पुन्हा थोडं मनातून मोहरून घेते....

सायेब येतात, ते ही आवरून घेतात...

मी आपली मनातून कॉफी करायला तयार...

माझं आपलं पुन्हा ग्यासवर दूधाच भांड ठेवण सुरु...

दुध गरम होतं....मी मग मध्ये ओतते.....

सायेब ..घेतात........

मी कॉफी तयार करण्याच्या बेतात....

सायेब बाहेर जायचे कपडे घालून पुन्हा तयार....

सरळ बाबांजवळ जातात....

माझ्याकडे न बघता....

"आई आम्ही बाहेर जाऊन येतो"..... सांगून बाबांना घेऊन निघून जातात....

पुन्हा कॉफीचे मग आणि मी वाट बघतो......

मग मी पोरांचं जेवणाचं बघते....

आणि माझे घटक चाचणीचे गठ्ठे....तपासायला बसते...

रात्रीचे दहा वाजतात...

कॉफीचे कप गुपचूप टेबलवर...कोस्टर तोंडावर ओढून.....तोंड बंद केलेले....

सायेब बाबांना परत घेवून येतात.....

मी अर्धवट झोपेत.....

कळत नाही.....

डोळे उघडतात....

सायेब कॉम्प्यूटर समोर बसलेले दिसतात...

"मी म्हणते रात्र किती झालीय ..."

सायेब हसतात....

म्हणतात..".म्याडम सकाळचे साडे सहा वाजलेत...."

मी म्हणते......" आरे उठवायचं नाही रात्री आलात तेंव्हा..."

सायेब सांगतात....." घरभर तुझे पेपर्स भटकत होते.....एकमेकांना मिठ्या मारत होते...क्यारी ब्याग मध्ये उचलून ठेवले... बघून घे.."

मी पुन्हा म्हणते......" उठवायचं न..."

"दमतेस ग दिवसभर ...गाढ झोपली होतीस नाही उठवलं..."

मी पुन्हा नवीन उपकारांच ओझं लादून घेते...

उठून किचनकडे येते...

माझ्यासारखेच...असतात....

कॉफीचे कप....

रात्री थकून .....वाट पाहून........शांत होऊन गेलेले .....

आपल्याच हातांनी उचलते....आणि ....

जशा माझ्या भावना कुठेतरी वाहून गेल्या...

तसेच सिंकमध्ये सांडून देते.....

आणि......... सायेबांची खरच सुटी होती??

विचार करत राहते......

आता मोहरत नाही मनातून...

फक्त आवरून-सावरून घेते.....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>