Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

प्रश्न -Mayura Rohit Khare

$
0
0

सुंदर कथा ...तिची रचना सुद्द्धा खूप भावली...तशी लिहायला कठीण आहे ही कथा...मयुराच्या दृष्टीत एक मिश्कील भाव असतोच. शाब्बास मयुरा.

प्रश्न – मयुरा रोहित खरे

गावावरून घरी येता येता सुजयनि मानसीला चारवेळा विचारलं असेल

“भूक किती आहे??”

“जेवायचं की नुसतं खायचं??”

“आत्ता थांबायचं की नंतर?”

“साउथ इंडियन खायचं की नॉर्थ इंडियन??”

“डिसेंट हॉटेल शोधायचं की ढाबा चालेल?”

“हॉटेल मध्येच जेवायचं की पॅकिंग घरी न्यायचं??”

मानसीचा पारा चढत होता!! कित्ती पिळतो हा माणूस!! तरी शांतपणे तिने उत्तरं दिली

“खूप भूक आहे(दिवसभर काम पुरलंय)”

“जेवायचं चांगलं व्यवस्थित”

“आत्ताच(रात्रीचे साडे नऊ झालेले)”

“ढाबा चालेल( पुन्हा डिसेंट हॉटेल महागची कटकट कोण ऐकेल?)”

“नॉर्थ इंडियन बघ(ह्या रस्त्यावर सौथ इंडियन मिळत तरी का रात्री?)”

“हॉटेललाच खाऊ( घरी पोहोचायला 12 वाजणार होते रात्रीचे केंव्हा खाल्लं असतं?)”

सूजयच चेहरा उघडा उघडा पडला. सहसा ह्या प्रश्नावलीच्या शेवटी मानसी चिडते आणि घरी चल खिचडी टाकते म्हणते..मानसीला त्याचं हिरमुसण समोरच्या काचेत दिसलं. दहा वर्षांची सवय असूनही हे कुठे तरी टोचलचं. डोळ्यात टचकन पाण्याचे दोन चुकार थेंब आलेच. मानसीच्या डोळ्यात आता पाणी असणार हे सुजयला जाणवलं. आता ही बया हर्ट झालीय. आता स्वतःला armadillo सारखी मिटून घेईल. तुम्ही जंग जंग पछाडलं तरी ती आता उघडणार नाही तर नाहीच.. सुजय करदावला. त्याला त्याची चूकच कळली नाही. एवढं काळजीने बोलतो तरी ह्या बाईला काही समाधान नाही.

तो खट्टू झाला. शेवटी सुजयच्या डावीकडच्याच हॉटेलला थांबणार turn घेणार नाही गाडी मागे जाणार नाही शेजारी सुद्धा परमिट बार नको pure veg हवंदोन तीन तरी families दिसायला हव्या ह्या तश्या पटणाऱ्या अटींच्या चाळणीतून निवडून एक ढाबा सापडला. गाडी लावून दोघे उतरले. मानसीच्या डोक्यात next प्रश्नावलीची टेप वाजली.सुजय ने तेच विचारलं एकही अक्षर इकडचे तिकडे न करता

“काय मागवायचे??” यक्ष प्रश्न एकदम

“थाळी मागवायची की स्वतंत्र?”

“पापड हवा की नको??”

“हवा तर कसा हवा?”

“दोन भाज्या की एकच?”

“तंदुरी की साधी?”

“बटर हवं की नको?”

“पाणी रेग्युलर की बाटलीबंद”

पण मानसी आज शांत राहायचं ठरवलेलं असल्यामुळे सुजयला नेहमीप्रमाणे

"तूच ठरव बाबा " हे पेटन्ट उत्तर दिलं नाही

“पनीर मसाला हवा”

“स्वतंत्रच ना म्हणजे”

“मसाला पापड हवाय”

“गरमगरम सूप हवं one by two “

“तुला नकोय? ठीक आहे मी घेईन सगळं.”

“शेव भाजी एक पनीर मसाला”

“तंदुरी बटर लावून”

“रेग्युलर पाणी “

सुजय एकदम गोंधळून बघतच राहिला. ऑर्डर येईपर्यंत त्याने mobile मध्ये डोकं घातलं.. बोलायचं नव्हतं ना. सगळा खर्च होणार होता. मानसी व्हिलनसारखी गालातल्या गालात हसली .ती इकडे तिकडे बघतेय. तेवढयात एक कार आली. अजून मेहंदी उतरली नाहीये असं जोडपं आणि तिचे कदाचित मोठे दीर जाऊ..हो तेच..उतरले. मानसीच निरीक्षण सुरू झाल. नवीन बायकोच्या बॉडीलाईन वरून आपलेपणा अनोळखीपणा स्वीकरून घ्यावं म्हणून प्रयत्न सगळं दिसत होतं. नवीन नवरा थोडा impression मारत होता. थोडा अधिकार दाखवत होता , दीर मोकळा वाटला, जाऊच अजून ठरत नव्हतं जाऊगिरी करू? की मोठ्या बहिणीसारखी वागू? कदाचित एकत्र राहणार नसतील. त्यामुळे 10-15 दिवस धाकटी बरोबर आहे. चांगलंच impression जमवायचं असा तिचा विचार असावा.

नवीन नवऱ्याच्या हातात मेनू कार्ड आलं. मानसीच सगळं लक्ष त्याच्याकडे गेलं. नवीन बायकोला इंप्रेस करायला त्याने तिला न विचारताच तिच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली. पुरावा म्हणजे नवीन बायको त्याच्याकडे स्निग्धांळ मधाळ लाजून बघत होती. त्यांनी असच काहीतरी मागवलं होतं म्हणून त्यांचं लगेच आलं.

सूप पिता पिता मानसी बघतच होती. तिला त्यांचे नवीन दिवस आठवले. कुठे तरी relate होत होती. किती गोड वाटत होतं!!! नवीन नवीन सगळं कसं गोड असतं.. नंतर सगळं फिकफिक होत जातं...

तेवढ्यात तिला नवीन बायकोच्या चेहऱ्यावर नापसंतीची रेष दिसली..आलेल्या मांचुरिअन मध्ये ग्रेव्ही असलेलं तिनी नवीन नवऱ्याला चमच्याने दाखवलं. नवीन नवरा बिचकत दुखावणार नाही एवढ्याच एक्स्प्रेशन देत करदावला,

" आधीच सांगायचं ना!"

आणि हिरमुसला

ती खाली बघत म्हणली

“विचारलं कुठे तुम्ही??”

आणि मानसीला खळखळून हसू आलं. खट्टू होऊन पापडात पूर्ण लक्ष केंद्रित केलेल्या सुजयला खूण केली की आपले गलगुच्चे तूच ओढून घे ! स्वतःचे गलगुच्चे घेत सुजय एकदम खुश झाला.

आणि दोघे मोकळे झाले.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>