उम्या कांबळे - माझा आवडता गोष्टी सांगणारा ....सुरेख गोष्ट घेऊन आला आहे...काळजाला हात घातलान.
सोहळा-उम्या कांबळे
पत्रकार म्हणून नवीनच लागलो होतो....माणसं जोडायची पहिल्यापासून आवड...कोणीही भेटला की उगाचच ओळख काढून लोकांना बोलत करायचं ही माझी लहांपणीपासूनची खोड ...ती अजूनही टिकून आहे ... त्यांची सुख दुःख ऐकायची....ते देखील असा ऐकणारा मिळाला की मन मोकळं करीत ... साला सामान्यांच्या आणि पैशेवाल्यांची दुःख जवळजवळ सारखीच...त्यात वयाच्या उत्तरीतली तर सेमच....वयानं मोठं माणूस दिसलं की मी लगेच बोलायला जातो त्याच्याशी...असच एकदा अंधेरीत फिरत होतो बाईक वरून...अंधेरीतल्या एक मोठ्या सिमेटरी पुढे एक आलिशान गाडी उभी होती ...गाडीत शोफर बसलेला...गाडीच्या बाजूला उंची सूट घातलेला सत्तरीतला एक माणूस..पाठीमागे हात बांधून शांतपणे उभा होता...समोर एकाचा दफनविधी चाललेला ...
कुतूहल जागा झालं माझं लगेच.... मी माझी बाईक लावली.... खांद्याला लॅपटॉप लावून सरळ चालत त्या व्यक्तीकडे गेलो....गोऱ्या तांबूस वर्णाचा तो उंचपुरा माणूस...तेल लावून सरळ भांग पाडून बसवलेले चंदेरी रेशमी केस....एक क्षणात दिलात उतरून गेला... साल म्हातारपण ही असाच असावं .... अगदी राजबिंड....
हेलो सर !!!!!
अं... हॅलो ...मी ओळखलं नाही तुला यंग बॉय ...!!!
सर आपण पहिल्यांदाच भेटतोय .....
ओके ...ये असं माझ्या बाजूला उभा रहा... आणि समोर बघ......
काय सर,,,?????
सोहळा मृत्यू नंतरचा...दिमाखदार सोहळा.....
तो मागे दिसतोय यंग बॉय त्या पेटीत झोपलाय तो त्याचा मुलगा .....बाजूला त्याची सुंदर पत्नी ....आणि तो गोंडस नातू....मस्त दिसताहेत ना ब्लॅक कोट ...रोझेस...कॉफीनं..देवदार लाकडाचं ...डिसाईनबाज....वाव....साला सोहळा असावा तर असा.....
साला हा माझा पेटंट शब्द्ध त्यांच्या तोंडून ऐकलं आणि मला हसूच आलं... तारा जुळत होत्या...
तुमचा कोण ??????
मित्र .....
फार सुखी असेल कुटुंबात .....
शिट..... हरामखोर होता...कधीही पटलं नाही पोराशी....कधी खेळवलं नाही नातवाला मांडीवर...एक नंबरचा तुसडा...
आश्रमात मेला..बेदम पैसा पण माणुसकी नाही..कापल्या करंगळीवर मुतला नाही कधी कुणाच्या .....मुलाला कळवलं मी.... तो आला रडत ......
तुम्ही नाही गेलात ते ?????
कशाला...अरे इथून बघ किती सुंदर सोहळा दिसतोय...जवळ ते खोट अश्रू...खोटे हुंदके ऐकवत नाहीत मला...राग येतो मला ढोंगाचा ....
जीवनाचा एक वेगळा अर्थ सांगणारा भेटला बऱ्याच दिवसाने ....
सर मी निघू? प्रेस ला जायचंय ....
तुझं कार्ड दे मला..कॉल केला तर भेटशील ?????
हो सर ... नक्कीच .....
थँक्स मित्रा....
थँक्स कशाला सर हा सोहळा बघायला बाजूची सीट दिलीत.....थँक्स तुम्हाला ...मी हात पुढे केला त्यांनी माझा हात हातात घेतला .....
एवढा मऊसूत हात अनुभवाला नव्हता कधी ... माझ्या हाताचं चुंबन घेतलं त्याने .... आणि त्यांच्या डोळ्यातून गरम अश्रू सांडला माझ्या हातावर ....
पण तो कसला?? आनंदाचा कि दुख्खाचा ??????
बरेच दिवस गेले मी माझ्या कामात व्यस्त झालो ..... आणि अचानक फोन आला ....
मित्रा....सोहळा पाहायला ये ....!!
गडबडीत बाईक काढून वैकुंठ भूमीत पोहोचलो ....
मित्रा इकडे !!!! जोराने हाक ऐकू आली....एका मोट्या पिंपळ वृक्षाखाली ते बसले होते. पंधरा शुभ्र झब्बा पायजामा घालून ....... आज कोण ????
मित्रच ....
पण माणसं दिसत नाहीत जास्त ????
गरीब माणसाचा सोहळा......भव्यदिव्य नसतो.....पण सोहळा असतोच.... अरे जन्मात याला कुणी फुल नाही दिल... आता हार तर दिसताहेत ...
मांजरपाटाचं तरी कफन आहे ... . बऱ्याचवेळा बघत बसलो आम्ही दोघे ...तो सोहळा बघत ....
चल बोलायचं आहे तुझ्याशी ....
चालत निघालो आम्ही ...
मित्रा मला कुणी नाही .....माझ्या मागे हा सोहळा कुणीही करणार नाही....घरात मेलो तर बेवारस म्हणून सरकारी गाडीत घालून नेतील पोलीस....आणि विद्युत दाहिनीत टाकून राख करतील...त्या राखेवर पण हक्क सांगायला कुणी येणार नाही रे ....
तुझा नंबर आहे माझ्याकडे ...पहिल्यांदा तुला बोलावतील ....येशील ??? ....
माझी सगळी संपत्ती दान करून टाकलेय...... मोठा भपकेबाज सोहळा नको करुस....पण एक फुल आणि पांढर कापड ...एवढं करशील माझ्यासाठी? माझा हा सोहळा तू पाहावंसं माझ्या डोळ्यांनी हीच इच्छा .....!!!!!
माझ्या डोळ्यात आसवं दाटली होती ...
पण सर मला अजून तुमचा नाव माहित नाही ....
मित्राला नाव नसत ......तो फक्त मित्रं असतो .....
असा म्हणून परत त्यांनी माझ्या हाताचं चुंबन घेतलं ..अश्रुनी माजा हात भिजला ......
खूप दिवस झाले याला .....
कधीतरी फोन येईल ...आणि मला सोहळ्याची तयारी करावी लागेल ...