Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

एयर पोर्ट–Neha Limaye

$
0
0

एखाद्या लघुपटा सारखी ही कथा आपल्या डोळ्यांसमोरून सरकत जाते...

एयर पोर्ट – नेहा लिमये

सकाळी ७.३० ला लँडिंग झालं.... बाकी जग झोपेतून जागं होत असताना इथे "धावतं"- नव्हे "उडतं जग" पुढच्या उड्डाणासाठी सज्ज होतंय...

असंख्य बॅगा arrival -departure करतायत.....

लहान मुलं आयांच्या खांद्यावर झोपी गेलेली.....

विकलांग अतीव कुतूहलाने आजूबाजूची धावपळ न्याहाळत व्हील चेअर मध्ये स्वतःच स्वतःचं ब्यागेज सांभाळत बसलेला......

सिनियर माणसे चहा -कॉफी चा आस्वाद घ्यायला जरा विसावलेली. ....

कॉन्व्हेयर बेल्टवर सारख्याच दिसणाऱ्या बॅग्स बघून गोंधळलेला तरुण ... बहुदा पहिलाच विमान प्रवास असल्यासारखा.....

टॅक्सी, उबेर, ओला हातातले बोर्ड सांभाळत आपापल्या साहेबाच्या किंवा मॅडमच्या प्रतीक्षेत.....

पुढच्या flight ची announcement आणि अचानक प्रसाधन कक्षातून airhostess चं अवतीर्ण होऊन escalator कडे धाव घेणं ....

या सगळ्या कोलाहलात तो आणि ती एकमेकांना न्याहाळतायत, ती त्याच्या मिठीत विसावते आणि तो तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवून पुटपुटतोय... तिचे डोळे पाणावलेले....त्याचा चेहेरा तिला असं पाहून कसनुसा झालेला....बहुतेक ही शेवटचीच भेट असावी. ती डोळ्यांनीच बोलते फक्त आणि तो तिच्या डोक्यावर थोपटून "येतो" म्हणतोय....पाठ वळवून त्याचं जाणं ती डोळ्यात साठवून घेत उभी राहते.. माहितीये तो परत दिसणार नाही.

आजूबाजूचं जग तिच्या डोळ्यातल्या पाण्यात केव्हाच वाहून गेलंय.... धूसर दिसणाऱ्या त्या जगात उरलाय फक्त त्याचा आभास.

आभाळात झेपावलेलं विमान ठिपक्याएवढं दिसलं , तेव्हा तिला जाणीव झाली .... एअरपोर्टवर आज नेहेमीपेक्षा जरा जास्तच गजबज आहे....!!!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>