Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

तगमग-Samiksha Bangade

$
0
0

समिक्षा खूप हृद्य कथा आहे...नियतीची...ही अपरिहार्यता खूप क्रूर असते!

तगमग – समिक्षा बांगडे

आज परत शेटच्या गाडीतून उतरताना तिच्या पाठीतनं एक जोरदार कळ उमटली आणि तडक डोक्यात गेली. घराजवळच्या गल्लीतल्या त्या वळणावर उतरताना रोज तिच्या पोटात असाच गोळा उठतो. पाय तर खाली उतरायचं मनात आले तरी जडावतात. चालण नकोसं होतं, अंधेरी येते थोड्या थोड्या वेळानं आणि खरंतर जगणं ही जीवावर आल्याची जाणीव होते ...

कशीबशी तोल सावरत ती गाडीतून उतरली तरीही शेटनं पुन्हा तिला जवळ ओढलचं. त्या दारूच्या नि सिगारेटच्या वासाची तशी आता तिला सवय झाली होती पण आज जरा जास्तच आतपासून भडभडून आलं. पण स्वतःला सावरत आणि शेटला ताकदीनं दूर लोटत ती गाडीतून खाली उतरली. गाडीचं दार बंद झालं.

माघारी वळून ती चालू लागली आणि तिची पावलं नको नको म्हणत असूनही परत एकदा घराकडं वळली. रोजची ती वळणापासुन घरापर्यंतची दहा मिनिटे अंतर चालणं आज खरंच तिला कठीण वाटत होते. क्षणात सगळा भूतकाळ परत डोळ्यापुढे तरळून जात होता.

लग्न करून महादेवच्या सोबतीनं तिने ह्या घरात पाऊल टाकलं होतं. आई बाबा नंतर आता महादेव हाच तिचं सर्वस्व झाला होता.

महादेव फार शिकला नव्हता. पण मोलमजुरी करून देखील चित्राला त्यानं सुखात ठेवलं होतं. चित्रा पोटी आनंदचा जन्म झाला. क्षणात एक छोटं कुटुंब मोठं झालं होतं. चित्रा महादेव नी त्यांचा आनंद.

अशात घात झाला. महादेव चित्राला आणि आनंदला पोरकं करून अनंतात विलिन झाला. निटसं शिक्षणही नाही न् त्यात मोठा होणारा आनंद. सर्व दिशा शांत होत्या. मदतीची अपेक्षा करायला ही कुणी उरलं नव्हतं.

त्यातच महादेवचा शेट सांत्वन करायला येऊन पोहचला. होणारे हाल पाहुन त्याने ठेवलेला नोकरीचा प्रस्ताव चित्राने जराही विचार न करता स्वीकारला. तिथेच घात झाला. हा प्रस्ताव चित्रासाठी नसुन तिच्या शरीरासाठी चालून आला होता. शेटच्या असल्या वारंवार येण्यामुळे आता शेजारीपाजारी कुजबुज ही वाढली होती. आनंदला ह्या पासुन दूर ठेवावं म्हणुन वेळीच तिने त्याला आपल्या दूरच्या बहिणीकडे पाठवलं. येणा-या मिळकतीत काय तो त्याच्या शिक्षणाता खर्च ती भागवायची.

एव्हाना विचार करत ती कधी घरी येऊन पोहचली तिला ही कळलं नाही. शरीरात त्राण नव्हतेच. तरी न्हाणीघरात जाऊन एक बादली पाणी अंगावर ओतली न् अवघं शरीर खाटेवर झोकुन दिले. कितीही अंग घासुन आंघोळ केल्याचा आता फायदा नव्हता. चिखलाने बरबटलेले शरीर स्वच्छ झाले असते. पण मनाचे काय? झोपेची आराधना सुरू झाली होती परंतु आजही दूरपर्यंत तिचा पत्ता नव्हता.

एकाकीपण आणि नसरणारे भोग तिच्या नशीबी आले होते. पण एवढ्यावर थांबतिल ते भोग कसले? लोकांच्या वाईट नजरांनी आता काळजावर घाव घालायला सुरूवात केला होती.

गि-हाईक सौदा करायला येऊ लागलं. सुरूवातीला प्रतिकार केलाही पण जेव्हा ती जबरदस्ती देखील होऊ लागली त्या वेळी नकळतं सौदा मनानं मंजूर केला. आता येणा-या मिळकतीच्या मोबदल्यात ती अनेकींच्या पायी कुस्करली जाऊ लागली.

संपवून टाकावं सगळं...! पण असा विचार केला तर समोर आनंद दिसायचा

दिवसभर जे मोठ्या कष्टाने पाणी परतवलं होतं आनंदच्या आठवणींनी ते पुन्हा एकदा चटकन डोळ्यात आणलचं. परंतू आता तिने वाहतं पाणी पुसलं. दिलखुलास हसली, खूप हसली. स्वतःच्या नशीबावर हसली, अगदी रोज हसते तशीच पण न अडवता.

खदखदून.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>