उम्याच्या धारधार शब्दातून तयार झालेले हे शब्द चित्र......
छिनाल-उम्या कांबळे
आज उपाशीच झोपली लेकर..,.हागणदारीच्या बाजुला झोपडीत.....लक्षुमी आताच येवुन बसली बाहेर....सकाळच कामाला गेलेती माय..,रातीच्या भुकेची सोय लावाय..दिसभर काम ...हातात तीस रुपड...ते बी रात्री नवाला....दुकान बंद झाली कधीच....काय मिळल...????
काय ग लक्ष्मे आज उशिर....
नाय जी...होतय कधीतर ....लय काम होत ...
राधम्मा ...गावाबाहेर टाकलेली ...छिनाल म्हणुन ....
अग कसल काम ...लय बार्या बोड्याची है ती रांड ....दिसभर काम करुन घेल ..मग वाड्याव
बोलवुन बाहेर बसुन ठेवल. घरात जेवणावळी घडतील..आपण आंवड घोटत बसायच मातुर.... मुद्दाम करते ती....ते दादला तीचा भायेर लय मर्द...पण घरात कुत्र्याचा पटा घातलाय तेच्या गळ्यात...पैक सुटत नाय तिच्या हातुन....
शिंदळीचे भडवे.....
अग मी नडले तिला...झिंझ्या उपटल्या..म्हुण मला छिनाल ठरवुन गावाबाहेर काढल त्या बायकोच्या बैलान...हे घे दोन भाकरी पोरास्नी उटव खाया घाल...सकाळपासुन उपाशी हैत पोर ...घे.....
गोठलेल्या काळजान लक्षुमी बोलली ..
राधम्मा ..,!!!!
काय ग लक्ष्मे????
मी बी आता छिनाल व्हायच ठरवलय ....
तडक उठुन तीन पोरांना साद घातली ..,
ये पोर्राहो उठा भाकरी खावुन घ्या ....
राधम्मा आणि ताठ झाली ..तीच्या डोळ्यात अभिमानाची ईज तळपुन गेली ...काळ्या डोळ्यात त्या ईजेबरोबर ऐक थेंब पाण्याचा शहारला ....
तिच्या पाठमो सावलीकड बघत लक्षुमी पोरांना भाकरी वाडत होती ...