कमी शब्दात केव्हढी मोठ्ठी जाणीव आज्ञा करून देत आहे.....शाब्बास!
जाणीव –आज्ञा पाटील
आज त्याच्या मुलीच लग्न होऊन दहा दिवस झालेत..आणि तिच्या आईच्या एक-दोन कामात तो पण मदत करायला लागला..
आणि पहिल्यांदाच सासऱ्याचा फोन आल्यावर त्यानं कुरकुर न करता त्याच्या बायकोला दिला..कारण आपली मुलगी हिच्यासारखीच कोणाच्या तरी घरी आहे, आपल्याला पण आपल्या मुलीचा आवाज ऐकावासा वाटतो ही जाणीव आता त्याला व्हायला लागली होती..