विलक्षण प्रश्न...ज्याला उत्तर नाहीये....फक्त आक्रोश आहे.
बाहुली-सुचिता घोरपडे
ती इवलीशी पोर एक मोडकी बाहुली हातात घेऊन खेळत होती.एवढयात एक व्यक्ती घरात आली. तिला हे नविन नव्हत.कारण मग काही वेळाने तिलाही एक मस्त चॉकलेट मिळायचं.
तो निघून गेला जाताना त्या पोरीला चॉकलेट देऊन.
मग तिने आईला विचारले, तू पण माझ्या बाहुलीसारखी त्या काकाचं खेळण आहेस ना? म्हणून तो तुझ्याशी खेळायला येतो?
तिने त्या पोरीला छातीशी कवटाळत हुंदक्याला गिळून टाकले.