Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पिऱ्या–सुनीत काकडे

$
0
0

सुनीतची शब्दकळा पहा...हे असे शब्द हल्ली शहरी लेखनात वाचायला मिळत नाहीत...मी सुद्धा नव्याने शिकतो आहे! शाब्बास सुनीत! तुम्ही सर्व मला व्यंकटेश माडगुळकर ह्यांची आठवण करून देता.

पिऱ्या – सुनीत काकडे

ऊन्हं कलती झाली तरी पिऱ्या झाडाच्या बुंध्याला टेकुन गपगार पडला होता. सावल्यांनी कधीच पार सोडुन पळायला सुरवात केली होती. वस्ती पासुन फर्लांगभर अंतरावर दत्ताचं ठाण होतं, त्याच्याच पायाशी लोळंत नशिबाला दोष देत ऊत्तर शोधायला तो पडायचा. पिंढरी पर्यंत पाय रूततील ईतक्या भेगा भुईला पडल्या होत्या, आणि त्या ऊसावलेल्या रानाकडं पहात सुर्य भागाईच्या कळसा मागं दडायचा प्रयत्न करत होता.

कळसावर गुरवाची पोरं ऊभारलेली गुढी ऊतरवत होती, गुडीला लटकवलेल्या हारगाठीसाठी चाललेली भांडण अस्पष्ट आवाजात ऐकु येत होती. ऊतारावर असलेली मऊसुत पखासारखी ही काळीशार जमिन अवकाळी कोसळलेल्या सरींनी भेगाळुन निघाली होती.

आजचा दिवसही रोजच्या सारखांच वांझोटा जाणार होता, पण सकाळच्या कळा दिवसा गणिक चढतंच गेल्या. सगळ्यात ऊंच गुढी ऊभी करायची म्हनुन पोरंग सकाळ पासुन हुंदडत होतं. न्हाणीच्या मागल्या गजपनातुन ऊंचच्या ऊंच बांबु शोधून त्याला मारूतीच्या देवळातून आणलेला शेंदुर फासत होतं. पिऱ्या आणि त्याच्या बायकोने सगळ्या पेट्या अडगळी झाडून काढल्या पण नवा कोरा झंपराचा पिस नाही सापडला, पातळाचा तर विषयच नव्हता. शेवटी पाव्हण्याच्या कार्यक्रमात भेटलंल ऊपरणं त्या बांबुला लटकवलं, स्टिलचा चेमटलेला तांब्या आन् भरपुर निंबाची आणि आंब्याची पानं लाऊन पोरांन गुढी ऊभारली.

बसल्या जागेवरून पिऱ्यानं गुढीकडं बघितलं, गरिबीची लख्तरं ऊपरण्याच्या झिरमीळ्यात वाऱ्याच्या झोतावर फडफडत साऱ्या गावाला सणाची दवंडी देत होती.....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>