चित्तथरारक हाच एक शब्द...रंग भरत चालला आहे.
पद्मालय – आसावरी देशपांडे
भाग ७
मनवा
आता पुन्हा एक नवीन स्वप्न...का मी या वाईट स्वप्नांच्या गर्तेत लोटली जातेय सारखी? स्वप्नात दिसलेले कॅलेंडर, फ़क्त ५ मे ला अधोरेखित करणारा मोठा गोल, त्याच कॅलेंडरवर सर्वात टोकाला वरती असणारे एक चित्र ...हिरवे लुगड़े नेसलेली बाई आणि धोतर सदरा घातलेला एक पुरुष...या चित्रातले चेहरे मी कुठेतरी पाहिलेत पण नेमके कुठे तेच आठवत नाही...त्यांच्या चेहऱ्या वरचे गूढ भाव खूप ओळखीचे आहेत... आणि नंतर दिसणारे प्रेत... काय अर्थ असेल या स्वप्नाचा?
उद्याच तर ५ मे आहे ...
(इतक्यात मिहीरच्या आवाजाने विचारांची मालिका तिथेच थांबते)
"मनवा ,आत्ताच ऑफिस मधून फ़ोन होता माझे ट्रेनिंग आहे,आपल्याला निघावे लागेल..उद्याच् जाऊ"
"काय असे अचानक? मिहीर तू जा ..ट्रेनिंग झाल्यावर इथेच ये, माझ्यासोबत शारदा आहेच इथली काळजी करू नकोस.."
मनवाच्या उत्तराने मिहीर अस्वस्थ झाला, त्यादिवशी डॉक्टरानी दिलेला उपदेश त्याला आठवला.. मनवाची या घरात राहण्याची ओढ़ ...पण त्याला जावेच लागणार होते..त्याला घ्यायला ऑफिस मधून गाडी येणार होती.. तोच त्याचा नेहेमीचा ड्रायवर केशव..
दिवसभर मिहीर मनवाच्या वागण्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता पण कुठेतरी ..काहीतरी चुकतय याची त्याला आता खात्री झाली .. मनवा आणि त्याच्यात निर्माण झालेल्या दुराव्याला तो स्वतःच कारणीभूत होता असं देखील त्याला वाटायला लागलं.. एक नातं जवळ आणण्यासाठी केलेला वेडेपणा ..आज त्याच नात्याला पोरकं करून गेला...
मनवा
ठरल्या वेळेप्रमाणे केशव आला, रोजच यायचा मिहिरला घ्यायला, पण आज काहीतरी वेगळा वाटत होता..नेहमी मी बोलावल्याशिवाय घरात पाय ठेवायचा नाही आज खुशाल घरात येऊन बसला देखील..
" केशव गाडी हळू चालव, " केशवने मानेनेच होकार दिला..
मी चहा आणण्यासाठी वळताच मला जाणवले की तो हसला.. तेच गूढ हास्य...सर्र कन अंगावर काटा आला...मी मनाची समजूत काढली..कदाचित भास् असेल..मिहीर लॅपटॉप घेऊन गाडीत मागे बसला....पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. गाडीने वेग घेताच गाडीच्या मागे लावलेल्या चित्रावर नजर खीळली आणि दातखीळच बसली... शारदा धावत आली..कांदा हुंगवला, पाणी मारलं.. मी शुद्धिवर आले...
"ताई कशापाई घाबरल्या..?" शारदाने विचारताच मी सगळा धीर गोळा करून बोलत होते..
"शारदा, परवा पासून एक स्वप्न सारखा जीवाला घोर लावतय.. एक कॅलेंडर त्यातले हिरवे लुगडे नेसलेली बाई आणि धोतर सदरा घातलेला पुरुष, ५मे तारखेभोवती मोठा लाल रंगाचा गोळा....आणि एक प्रेत..." बोलता बोलता मी थांबले..
"आवं कशापाई घाबरता इतकं... माझ्याकडं बी हाय की..." (शारदा ते कॅलेंडर दाखवत म्हणाली) "काय?.....
मान वर करत असताना एक भास् झाला ..शारदाच्या गूढ हसण्याचा.. भीतीपोटी तोंडातून एक शब्द देखील काढायची हिम्मत होत नव्हती... पण एवढे नक्की काहीतरी .....इतक्यात...
दारावर पड़लेली थाप ...
मी दार उघड़ताच ...समोर शारदा ऊभी होती...
क्रमशः