श्रद्धा जोशी...नुक्कडवर नवे आगमन...आणि काय सहज कथा घेऊन आल्या आहेत त्या...मस्त!!
विक्रम
डायरी – श्रद्धा जोशी
जुन्या डायरीची पानं चाळताना अनेक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. जुन्या दु:खाला ती परत गोंजारु लागली,पण क्षणभरच......
शेजारीच असलेल्या को-या करकरीत पानांच्या नव्या डायरीने तिला भानावर आणले.
आता याच डायरीच्या पानांवर तिला परत पहिल्या पासून सुरुवात करायची होती....... लिहीण्याची........ नाही, खरं तर जगण्याची.....!!!!