Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

विरह–तेजस्विनी

$
0
0

नाती खूप फ्रजैल असतात...पण आपले मानवी मन ते मानायला तयार नसते...नात्यात सोय खूप महत्वाची असते...हे क्रूर सत्य आहे.

विरह – तेजस्विनी

"जपलं नव्हतंस नातं इतकं जपलंस मौन...मौनही असते हजारार्थी" संदीप खरेच्या या ओळींनी ओजस्विनीचं मन एक वर्ष मागे गेलं.

निलेश तिच्या ऑफिसमध्ये आलेला नवीन मुलगा. Handsome आणि brilliant. अगदी कुठल्याही मुलीला आवडेल असा. गावाकडून शिक्षणासाठी आलेला आणि इथलाच झालेला. पण शहराची हवा ना लागलेला. म्हणजे गावची नाळ न तुटलेला. हळवा आणि निरागस. आई वडिलांच्या आठवणींमध्ये हरवून जाणारा आणि त्यांच्या सुखासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी ठेवणारा. सर्वांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा. साहजिकच मनस्वी असलेल्या ओजस्विनीचं आणि त्याचं छान जमलं. ती साधारण त्याच्या आईच्या वयापेक्षा थोडी लहान. तिला त्याच्यात तिचा मुलगा दिसू लागला, अन् तोही तिच्यासोबत comfortable feel करू लागला होता. ऑफिसमधल्या सर्वांच्या नकळत त्यांचं एक घट्ट नातं निर्माण झालं.

अन् एक दिवस अचानक त्यानं नोकरी बदलली, अर्थात हिच्याशी बोलूनच. मग काय त्याच्या नव्या नोकरीच्या वेळा सांभाळून यांच्या गप्पा सुरू झाल्या. अगदी याच्या लग्नाची स्वप्नं देखील दोघं रंगवू लागली. तिला स्वतःचा मुलगा नव्हता पण आता तिला असं वाटू लागलं की हाच माझा मुलगा.

एके दिवशी अचानक म्हणाला की आपण काही दिवस नको बोलूया कारण काय तर म्हणे मला फक्त माझ्या future वर concentrate करायचं आहे आणि माझ्या आईबाबांना शहरात कायमचं आणायचंय कायमचं. हे त्याचं काहीतरी नवीन खूळ आहे असं समजून तिनंही त्याच्या हो ला हो केलं.मग त्यांचे chats बंद होत गेले आणि फोनपण. नंतर अगदी सगळे काँटॅक्टस त्यानं बंद केले. तिच्या मेसेज, chat किंवा इमेल्सना त्यानं उत्तर देणं बंद केलं. सगळ्या social sites वरून तिला ब्लॉक केलं. तिचा जीव मात्र तीळ तीळ तुटत होता रोज. तिला नक्की कळेना की काय कारण आहे या मागे. काही गैरसमज तर नाही ना झाला त्याचा? पण कळायला काही मार्ग नव्हता. आता काळ हे एकच उत्तर होतं साऱ्या प्रश्नाचं.

विरह मग तो कोणत्याही नात्यातला असो, त्रास तेवढाच देतो. आई मुलाचा असो किंवा मग प्रियकर प्रेयसीचा नाहीतर मग देव आणि भक्ताचा, त्रासदायक तितकाच असतो हेच खरं. कधीतरी तो भेटेल, नातं नसलं तरी चालेल पण तो असं का वागला हे तिला विचारायचं आहे.आणि हेच म्हणायचं आहे की जपलं नाहीस नातं इतकं जपलंस मौन...मौनही असतं हजारार्थी........


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>