Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

राणू-संजन मोरे

$
0
0

राणू- जीवनात एक क्षण येतो...आणि आपण बदलतो...तसच काहीस...

राणू-संजन मोरे

मांडी खाली दबलेलं घोडं, जड पायताणं, कुऱ्हाडीचा घाव थोपवणारी अंगावरची घोंगड्याची दाट खोळ, दगडाचा पाऊस झेलणारं मुंडासं, हातावरल्या भाकरीसारखा रूंद, ओबडधोबड पंजा, त्यात दोन वित रूंदीची धारधार फरशी कुऱ्हाड, मुठी येवढ्या जाड पीळदार मिशा, खोंडाच्या गर्दनी सारखी भरदार गच्च मान, झाडाच्या खोडासारख्या जाडजूड मांड्या, लोखंडी मोटेसारखी रूंद छाती, छोट्या टेकडीसारख्या धिप्पाड देहाचा राणू, बघणारांच्या नजरांचं पाणी करत, पेठ पार करून, शाळेसमोरच्या पटांगणात येवून उभा राहिला अन शाळेच्या पटांगणात, झाडाखालच्या वाळूत बसून गमभन गिरवणारा ल्योक बघून पाटाच्या पाण्यात ढेकूळ विरघळावा तसा पाणी पाणी झाला.

आतून बाहेरून झंझारून निघाला. हातातल्या फरशी कुऱ्हाडीची त्याला लाज वाटली. तेंव्हापासून राणूने फरशी टाकली. डोंगरासारखा राणू माणूस झाला. माणसात आला. राणूचा मुलगा आज सरकारी नोकरीत आहे. खडक फोडून पोरगा शिकवणारा राणोजी म्हणून लोक त्याला ओळखू लागले ……...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>