वर्ष अखेरची ही कथा...ज्ञानदेव पोळ ह्यांची...हलवून टाकेल तुम्हाला आणि नव वर्षात सुद्धा बरोबर राहील.....
आण्णा – ज्ञानदेव पोळ
मी पाहिलाय...
रखेल ठेवलेल्या सोनुबाईला
तरूणपणी वाड्यात कोंबून
एका घमेल्यात तिला माडीवरच
अंघोळ घालून,
स्वता:च अंघोळीचं पाणी खाली टाकून
सोळा वरसं तिच्या नजरेला
गावाचं दर्शन होवू न देताच
तिच मढ बाहेर काढणारा
मधल्या वाडयातला मावळतीकडं झुकलेला
रंगेल "आण्णा"