हे किती खरे आहे..खुले आम केले तर वाईट...बंद दार आड...??? तसे आपण नेमीच काहीना काहीतर मागत असतो...काहीच नाही तर शांती!!!
विक्रम
मांग – स्वाती चांदोरकर
तो निघाला, त्याने गाडीचं दार उघडलं, धाडकन लाऊन घेतलं. त्याला दारं आपटलेली आवडत नाहीत. त्याने ए सी फूल केला. गाडी सुरु केल्याकेल्या ए सी फूल केलेला त्याला खपत नाही. त्याने गेट मधून बाहेर पडताना गाडी सुसाट नेली. गेट मधून बाहेर पडताना असा गाडीचा वेग त्याला सहन होत नाही. त्याने सिगारेट शिलगावली. गाडीच्या काचा बंद ठेवून सिगारेट ओढलेली त्याला चालत नाही. धुराचा ठसका लागतो. तसा तो लागला. नाक डोळे लाल झाले. डोळ्यातून पाणी येण्या इतपत ठसका लागला.
मग तो जरा थांबला. थांबावं लागलं, कारण सिग्नल लाल होता. ऑफिसच्या बिल्डींग मधून बाहेर पडल्या पडल्या सिग्नल. आणि तो नेहमी लाल असतो, तो कसा? ह्याचं कोडं त्याला गेल्या सहा वर्षात सुटलेलं नाही.
सिग्नल लाल असतो आणि त्या सिग्नलवरचे सर्व भिकारी त्याला ओळखतात आणि तो त्यांना ओळखतो, म्हणून हटकून त्याच्या गाडी जवळ येतात आणि तो मेह्मी सारखी फक्त मान हलवतो. कुणी त्याला बाय बाय करतात तर कुणी सलाम करतात.
तो त्याला सलाम करत होता. काचेवर त्याच्या हातांचे, बोटांचे ठसे उमटत होते. काचेच्या आतून ते ठसे बघताना त्याच्या नाकाचा शेंडा अजून लाल होत होता. त्याने काच खाली केली.
‘क्या है?
‘कुछ दो ना साब..
‘आगे जाओ...
‘साब
‘कांच खराब मत करना..
‘वो तो साफ हो जायेगी, खाने के लिये दो साब..
‘खाने के लिये? सब लोग यही मांगते है.. खाने के लिये.. देना पडता है.. ना दिया तो गयी नौकरी..साले खुद तो खिलाखीला के ऊपर गये., अब मुझे ऊपर जाना है तो इनका खिसा गरम करो.. क्यू करू? मैं कुछ मांग नहीं रहा हुं..हक है मेरा..वो मांग रहा हुं .. उधर भी दूं , तुझे भी दूं.. साली, नही चाहिये नौकरी.. छोड दि.. अब मेरे पास कुछ भी नहीं .. समझा? चल, आगे बढ...काम कर कोई...
‘क्या साब? काम ही तो कर रहा हुं. मांग रहा हुं.. आप भी मांग रहे हो.. आपकी मांग सही और मेरी मांग गलत? ऐसे कैसे? मांग तो हम सब रहे है.. फर्क सिर्फ इतना है के में रोड पे खुले आम मांगता हुं और आप बंद कमरेमे छुप छुप के मांग रहे हो.. दे दोना साब...