Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

शयनेषु रंभा – सुरेखा मोंडकर

$
0
0

ही फिरस्ती...नेहमीची फिरस्ती नाही...खूप विचार करायला लावला ह्या कथने....

विक्रम

शयनेषु रंभा – सुरेखा मोंडकर

" तू मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस. शांतपणे एकाजागी बस बरं! मला विसरायला होतं रे सोन्या! ... बघ चार्जर विसरत होते.\" " मी करतोना तुला ब्याग भरायला मदत. हे इथे ठेवलेलंच सगळं भरायचं ना? मी भरतो! तू नुसती माझ्याशी बोलत बस" " नक्को! एक नंबरचा धांदरट आहेस. कुठेतरी इजा करून घेशील आणि मग माझं जाणंच रहित होईल." " नको, नको! किती दिवसांनी बाहेर जायचं ठरवलंयस, तुझा घरा बाहेर पाय पडेल तर ना!" तो घाईघाईने म्हणाला. " मी नसले घरात तर तुझी काळजी कोण घेईल रे सोन्या!" " खरं म्हणजे तू कालच ब्याग भरून ठेवायला हवी होतीस. मग आत्ता आपण जरा निवांतपणे गप्पा मारल्या असत्या."

पण तिचं लक्ष कुठे होतं त्याच्या बोलण्याकडे,"काल दिवसभर तुझ्या आवडीचा सगळा खाऊ करून ठेवलाय. हे बघ सगळे डबे इथे समोरच ठेवलेत! गाजर हलवा आणि खरवस फ्रीज मध्ये आहे. मायक्रोवेव्ह लावलास तर जपून! ग्यास वर दूध ठेवून पेपर वाचत बसू नकोस. आणि हो... हल्ली ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा लागतो बरं का! ह्या बघ दोन कचऱ्याच्या बादल्या आहेत. आणि राजा दुधाची रिकामी पिशवी ओली असली ना, तरी ती सुक्या कचऱ्यात ....."

"मी सगळं नीट करतो गं! चार दिवसांचा तर प्रश्न आहे" एकाएकी तिचा आवाज हळवा झाला. त्याचा केसातून हात फिरवत म्हणाली,"जाऊ ना रे मी? राहशील ना एकटा? की चार दिवस तुझ्या माहेरी जातोस?" "राहीन गं लहान आहे का मी?" "खरं म्हणजे तुझ्या सुट्टी प्रमाणेच ट्रीप ठरवली होती.पण आयत्यावेळेला तुझ्या ह्या महत्वाच्या मिटींग्स उपटल्या.... रिसोर्टचं बुकिंग पण झालंय .. आणि ट्रीप क्यान्सल झाली तर सगळेच नाराज होतील नां... " तिला खूप चुटपूट वाटत होती. आज पर्यंत त्याला एकट्याला घरी ठेवून ती कुठे गेली नव्हती. "खरंच तू जा गं; मजा कर. फॉरेन डेलिगेशन येणार आहे म्हणून; नाहीतर मी मिटींग्स पुढे ढकलल्या असत्या." रस्त्यावर गाडीचा हॉर्न वाजायला लागला होता. त्याने पटकन तिची ब्याग उचलली, लगबगीने ती निघाली. बाहेर उभ्या असलेल्या गाडीतल्या बच्चे कंपनीने 'मावशी ,... मावशी' म्हणून एकच कल्ला केला. ती खुशीत त्यांच्या कळपात शिरली. तिची ब्याग गाडीत ठेवून निरोपाचा हात हालवत, सगळ्यांना स्माईल देत : गाडी दिसेनाशी होई पर्यंत तो तिथेच उभा राहिला .

मुलं तिला खूप आवडतात. स्वतःच्या मुलाची आस तिने अजूनही सोडली नव्हती. मूल दत्तक घ्यावं, त्याच्यावर आपल्या प्रेमाची पाखर घालावी, आयुष्याला रंगत आणावी, हे अजून तिने स्वीकारलं नव्हतं. मित्र, मैत्रिणींच्या,नातेवाईकांच्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करून ती आपली भूक भागवून घेत होती .आणि घरी त्याची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेत होती.

वात्सल्य, ममता आणि एका तरुण पुरुषाला पत्नी कडून हवं असणारं प्रेम ह्यातला फरक तिच्या लक्षातच येत नव्हता कां? स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते, असं म्हणतात ते इतकं खरं असतं? पुरुषाला पत्नीच्या रुपात भोज्येषु माता हवी असते, पण शयनेषु रंभा हवी असते, प्रणयोत्सुक अभिसारिका, उतावीळ, आक्रमक, मिलानातूर प्रेयसी हवी असते: हे कसं नाही हिच्या लक्षात येत!!!

एक सुस्कारा सोडून तो वळला. गेट ओढून घेतलंन, जाणूनबुजून कडी लावली नाही.

घरात शिरता शिरता मोबाईलवरून फोन लावला. "कोपऱ्या पर्यंत आली असशील ना ? ये आता घरी, ती गेलीय ट्रीपला! दार उघडंच आहे. फक्त ढकल !! "


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>