अप्रतिम लघुतम कथा आहे ही....
विक्रम
फूल – वंदना धनेश्वर
ममत्वाच्या मखमली आवरणात ते फूल उमललं होतं. जिव्हाळा, वात्सल्य, आणि विश्वासाच्या उबदार प्रेमाची ती कोवळी किरणं आता कायम आपल्या सोबतीला, अशी त्या फुलाची भाबडी समजूत होती.
मात्र हळूहळू, वास्तवाचं प्रखर ऊन तीव्रतेनं बोचायला लागलं. निसर्गाचा बदललेला सूर अन् माणसाचा पालटलेला नूर, इवल्याश्या फूलाला सहन झाला नाही.
आणि,
निसर्गचक्रात आक्रित घडलं...
त्या फुलानं, स्वत:ला स्वत:मध्ये मिटून घेतलं.
खोल. अगदी खोल.
ते फूल सुकलंही नाही. गळून-तुटून संपलंही नाही. मनातल्या गडद्द काजळधारेला उराशी घट्ट कवटाळून घुसमटत राहिलं.
आतल्या आत.