हे वास्तव आहे...कितीही पटत नसले तरी...भिक मांगने हा एक तेजीतला धंदा आहे..स्वस्तात पुण्य मिळवायचा मार्ग आहे तो सर्वसामान्यांसाठी.
विक्रम
दया - प्रदीप काशिनाथ बालगांवकर
देवळा जवळ भीक मागून राया गाडीने आपल्या बंगल्यात आला. भिकाऱ्याचा ड्रेस बदलला. वाटेत त्याच्या पुढ्यात बसणाऱ्या लहानग्याला दादाच्या ताब्यात दिले. पांगळ्याची भूमिका करून पाय दुखत होते. पायाला तेल चोळत बायकोला म्हणाला, गल्ला मोज. मी पूजेला बसतो.
दोन घोट झाल्यावर बायको म्हणाली, कमाई तीन हजाराच्यावर आहे. दहाच्याच नोटा जास्त आहेत चिल्लर कमी आहे. लोक चिल्लर टाकण्यापेक्षा नोटाच टाकतात.
व्हिस्कीचा घोट घेत, काजू खात राया हसत म्हणाला, अलीकडे लोक फारच दयाळू झालेत. म्हणून आपला धंदा जोरात आहे. पण माझ्या ऐवजी तू बसलीस लहान मुलीना घेऊन तर याच्या तिप्पट, पांगळी होऊन बसलीस तर पांचपट. तरीही तू तयार नाहीस. बघ परत नीट विचार कर.