काही सत्य क्रूर असतात...खूप जीवघेण असते ते.....
विराम
तप्तपदी – संजीवनी मराठे – गोडबोले
तिचं वय नव्हाळीच...बावीस, तो गधे पंचवीस पार केलेला होतकरु, TDH. कांदेपोहे, लगेचच पसंती म्हणजे थोडी घाईच..पण तरीही एक हुरहुर, औत्सुक्य, घालमेल, सार काही नवं आणि नवी जाणीवही ...
खूप सा-या भावनांची परडी जणू फुलांची.. असंच काहीस. तो खास दिवस, ती लगबग, ते सनईचे सूर, मेंदी, ते पवित्र विधी अग्नी साक्षीने आणि तो न कळत होणारा ओझरता स्पर्श..गळ्यात एक पवित्र आणि मंगल धागा.
ती स्वप्नाळू वेडी. तिची उत्कटता, तिची अधीरता, ती शोधते आपलेपणा मैत्रीचा, तिची स्वप्न आश्वासक आणि स्पर्श विश्वास शोधणारा..
तो मात्र बेफिकीर, राकट, रासवट हुकूमत गाजवण्याच्या तयारीत. ती शब्दातली जरब, तो दर्प, ते फर्मान.. मला हव ते, हवं तेंव्हा, हवे तसे, हवेच हवे, आणि नाही मिळाले तर.....जातोच कसा मी नेहमी प्रमाणे लाल माडी,लाल बत्ती आणि खूप सारी हुंगलेली फुलं अनेक रात्री, भुकेली शरीर.... म्हणे पवित्र बंधन.
नाईलाज जगण्याचा आणि मरणही नाही स्वस्त.......