उत्कर्षाच्या ह्या कथेत शेवटच्या ओळीत गोम आहे कथेची....
विक्रम
त्याच आयुष्य - उत्कर्षा मुळ्ये
तो काहीसा चिड्लेला..वैतागलेला..प्रत्येकजण असतो तसाच..कारण स्पर्धा चालू आहे,..अन् प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यात गुंतलाय..अप टू डेट रहायला लागलाय..तो ही यातलाच एक..रोजच तेच तेच वेळापत्रक,एक रविवार तो ही आधीच इतरांनी ठरवून घेतलेला.. प्रत्येकवेळी इतरांचा विचार करून चाललेला..मग चिडचिड होणारच..
ती पुन्हा पुन्हा विचारतेय, “का चिड्तोस जग ना स्वतःसाठी.. कोणी अडवलय तुला? का विचार करायचा दुसऱ्याचा?”
“त्याना वाईट वाटेल, ते काय म्हणतील?”
“अरे म्हणू दे ना..ते करतायत का असा विचार. मग जग ना तु ही”
तर पुन्हा तिच्यावर चिडचिड..!!!!
पुन्हा नवा सोमवार त्याच्यासाठी रोज सारखाच..तीच धावपळ, ओढाताण ऑफीसमध्ये पुढे जायची रेस..
“अरे हो हो..ब्रेक घे थोडा..काय चाललंय..मशीन आहेस का तु?”
सकाळी तिचा आलेला मसेज..“आज बाहेर जाऊया का?”
“रात्री आठ वाजता पाहिला..”
“अरे काय हे.. कोणासाठी आहे हे सगळ?
ती, “घरासाठी वस्तु घ्यायला जाऊया का?”
“यावेळी नको पुढच्या महीन्यात बघू..घरी पैसे पाठवायचे आहेत”
“अरे अजून किती? थोडा आपला विचार कर..माझ्यासाठी नको..आपल्यासाठी कर”
पुन्हा चिडचिड.. तीच गप्प बसण.. एक एकट रडणं..
बऱ्याच महिन्यांनी कळून चुकलं.. ज्यांच्या साठी करत होतो त्याना किमतच नव्हती.. विचारानी थैमान घातल..तेव्हा ठरवल बस्स जगायचं आता आपल्यासाठी.. तिला मेसेज केला,
“एका दिवसासाठी मला कॉल मेसेज करू नकोस..मीच तूला कॉल करेन.”
आपल्याच धुंदीत बाहेर पडला.. रूमवर न जाता बसने पूर्ण शहर फिरत राहिला. स्वतःसाठी शॉपिंग केली. मित्राची बाईक घेऊन लॉंग ड्राइव्हला गेला..मस्त आपल्याच धुंदीत शीळ घालत. नंतर रूम वर येऊन कोणताच विचार न करता झोपी गेला.
ती त्याच्या विचारात गुंतलेली. कुठे असेल काय झाल असेल? शेवटी न राहवून मेसेज केला पण काही रिप्लाइ आला नाहीँ..त्याच्याच विचारात झोपी गेली..सकाळीच त्याचा कॉल आला, “तयार हो..आपण बाहेर जातो, कुठे, काय सगळ सांगतो.
पुन्हा तिच्यासोबत मज्जा मस्ती..ती ही मनापासून सुखावली..
तो- “एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी.”
ती – “काय?”
तो – “पुढ्च्या महीन्यात बाईक न घरासाठी शॉपिंग.. आता तरी राणीसाहेबा खुश आहात ना?”
तिच्या डोळ्यात आनंदाश्रू..सुखावली मनापासून..
जस तिला हव होत तसच..तो जगत होता “त्याच” आयुष्य.. मनमुराद.. कोणतंही बंधन न बाळगता!!!