Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

व्यस्त-Janhavi Patil

$
0
0

एखादा लेखक एका टप्प्यावर पोचला की त्याची दृष्टी खूप विस्तारते...आणि एक वेगळे लेखन त्याच्या हातून होते. जान्हवी...तू त्या टप्प्यावर आता पोचली आहेस असा संशय घ्यायला जागा आहे.

व्यस्त – जान्हवी पाटील

फ्लायओव्हरखालुन वळसा घालून स्टेशनच्या दिशेने वळलेली बीएमसीची ऑन ड्युटी गाडी आणि तिला येतांना पाहून, एकमेकांना मारलेल्या हाकांसोबत, स्टेशनपासून सुरू होणाऱ्या एकेरी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या शहाळंवाला, मध्येच एखादा अगरबत्तीवाला, एखाद्या मोकळ्या चौकोनी तुकड्यात पथारीवर मोजे, रुमाल, की-चेन सारखं चिल्लर समान टाकून उभा असलेला एकदा कुणी, केळीवाला, इडलीडोसा, सँडविचवाला, उपमा, वडे, सामोसे, पुरी- भाजी, शिरा-पुरी, खिचडसोबत, छास लस्सीच्या हातगाड्या, टेबलं, ठेले, फटाफट बंद होत गेले.

पत्र्याची, लाकडाची टेबलं, सिलेंडर, मोठाल्या तेलाने भरलेल्या कढया आणि स्टोव्ह, पीठं, भाज्या, चटण्या, सांबार भरलेले डबे, भांडीकुंडी.. डोक्यावर टाकून, आसपासच्या बिल्डिंग मधल्या अरुंद गल्ल्यांमध्ये अदृश्य करायची घाई आणि 'गाडी येऊन सामान उचलुन गेली तर काय' ची भीती त्या एकेरी रस्त्यावर पसरत गेली.

चलो चलो म्हणत पांगवलेले गिऱ्हाईक आणि त्यांचे हिशोब, बाद मैं देना च्या बोलीवर संपले.

थोडंच अगोदर गाडीतल्या माणसांनी उतरून हाताशी लागेल ते समान उचलायला घेतलेलं पाहून घाईघाईत गोंधळून गेलेल्या त्याच्या हातातून निसटलेल्या कढईतुन कढत तेल चssर्रssर्र आवाज करत जमिनीत जिरत गेलं.. तेलाचा उरलेला ओहोळ पुढे पुढे वाट काढत गेला.

त्याची मातीत पडलेल्या वड्यांसोबत डोळ्यांत जिरत थिजत जाणारी हतबल वेदना अन हासडलेल्या शिवीसोबत आलेली कुणावरही न काढता येणारी चीड...

...आणि...

...ते वडे पाहुन कुठुनश्या कोपऱ्यातुन धावत फाटके कपडे, विस्कटलेल्या झिपऱ्या उडवत आलेल्या त्या चिमुरड्या पोरीच्या नजरेतला आनंद... घाईघाईनं दोन्हीं हातांच्या ओंजळीत मावतील तितक्या वड्यांना लागलेली माती झटकून, वडे पोटाशी कवटाळून पळताना खुशीनं तिचे चमकणारे डोळे...यांचे गणित उगाच व्यस्त होत गेले..


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>