फक्त सूक्ष्म निरीक्षणातून अशी कथा जन्मू शकते...शाब्बास रश्मी .
सोन्यासारखा जीव!! – रश्मी पदवाड मदनकर
भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना, .पाणी पाणी जीव होतांना काळवंडलेली-कृश पारो... कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कणकण शोधणारी....
हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.—