Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

ती …. मृणाल वझे

$
0
0

मृणाल तू काय लिहून गेली आहेस...ह्याची कदाचित तुला सुद्धा कल्पना नसेल...मी कितीतरी माझ्या खोलीत बसून ह्या दृश्याचा विचार करीत होतो...स्वतःला सहानुभूती मिळवत जगणे खूप सोप्पे असते...हे असे जगायला निष्ठा लागते...जीवना प्रती...

विक्रम

ती …. मृणाल वझे

एक आई ….

पुन्हा एकदा रेल्वे फलाटावरची ….

रोज दिसायची मला …. एक १५ वर्षाचा मुलगा बरोबर … हाताचे बोट धरलेला …।

आई छानश्या पेहेरावातली…. उच्चवर्गातली …. छानशी ब्रान्डेड पर्स एका खांद्याला तर दुसर्या खांद्यावर एक दप्तरासारखी sack …. !

वय वर्षे ४५ ते ५० मधली …. एखादी बट रुपेरी … ती नक्की त्या मुलाची आईच असेल…. !

शांत चेहेरा …. निश्चल भाव …!

तिच्या बरोबर तिचा मुलगा … शाळेचा गणवेष घातलेला …कायम चेहेर्यावर खूप उस्तुकता…..

तर ….

रोज संध्याकाळी तो मला दिसायचा …. त्याच्याकडे नी त्याच्या आईकडे बघून मला मात्र रोज असंख्य प्रश्न निर्माण करून जायचा …!

एखादी गाडी आली की त्याच्या चेहेऱ्यावरती खूप चलबिचल जाणवायची …. तो नुसतेच हात हलवत राहायचा (टा टा करताना हलवतात तसे नाही )

पूर्ण गाडी जाईपर्यंत त्या गाडीकडे उत्सुकतेने बघत राहायचा … गाडी गेली की ती बिचारी आई त्याचे बोट ओढत त्याला तिथून न्यायाचा प्रयत्न करायची … पण तो तिला अजिबात दाद द्यायचा नाही …

तेव्हड्यात दुसरी गाडी यायची …. की पुन्हा तेच सर्व संगतवार याच क्रमाने घडायचे …. !

आपली एखादी गाडी चुकली तर दुसरी पटकन यावी असे आपल्याला नेहेमी वाटते पण मला मात्र रेल्वेचा राग यायचा. असे वाटायचे की जरा गाडी लेट यावी म्हणजे त्या आईला जरातरी वेळ मिळेल याला फलाटावरून बाजूला न्यायचा ….

असे किती वेळ चालायचे कोण जाणे ….!त्याच्या चेहेऱ्यावरचा भाव … नी … त्याच्या आईच्या चेहेऱ्यावरचा शांत भाव !…. माझ्या मनात खळबळ माजवून जायचा !

मला फार वाटायचे …. त्या आईशी बोलावे ….! तिला काय नक्की वाटते ते विचारावे …. त्या मुलाशी बोलावे …. त्याला नक्की कशाची उत्सुकता आहे … काय हवय त्याला …? तिच्या मनात नक्की असेल की हे असे किती दिवस चालायचे …. ? ती तर दिवसेंदिवस थकत चाललेली … ! कसे होईल ह्याचे …? कोण करेल ह्याचे ….? पण तिचा तो शांत चेहेरा मला मात्र विचार करायला भाग पाडायचा ….!

पण माझी गाडी आल्यावर मला वेळ नाही अशी लंगडी सबब मीच माझ्या मनाला द्यायचे नी गाडीत चढायचे असंख्य प्रश्न मनात घेऊन …

ती आई अशी किती वेळ उभी राहत असेल ?…. न थकता … न कंटाळता … न चिडता …. !


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles