हा माणूस काय लिहितो...ह्याच्या मनात एक उत्पात चालू असतो की काय...हृषीकेश जोशी तुमच्या साठी .....
विक्रम
उल्का - हृषीकेश जोशी
थंडीची चाहुल लागली की अनेक गोष्टी आठवतात.
एकदा एका डोंगरावर उल्कापात पहायला गेलेलो ती मजा आठवते. जनरली नोव्हेंबर डिसेंबर मधे असतो तो तारा वर्षाव..
लहानपणी बोंब उठली बातम्या आल्या की लोक टेरेस वर जमायचे. अगदी अविस्मरणीय अनुभव.. पौंगंडावस्था ते अगदी आज पर्यंत कोट्यानी उल्का पडल्या असाव्यात. मी तर शेकडो पाहील्या खुल्या आकाशातून सुरसुरताना..
त्यातल्या काही इच्छा पूर्ण करून गेल्या.. त्या उल्का पड़ेपर्यंत मनात वाक्य पूर्ण व्हायचं नाही.. उल्का ही मनात घर करून राहिलेल्या आणि न पटलेल्या सुंदर प्रेयसी सारखी आहे.. साला तिला मी ही काही सांगू शकलो नाही. कारण तिनेही माझं कधी ऐकूनच घेतल नाही.
परत त्यानंतर ती कधी दिसलीच नाही.. धुक्याच्या वाटेवर तिची गडद आठवण स्मोक करत रहाते तहानलेल्या मनावर..
आणि माझ्या निस्तेज मनाकडे मात्र जळलेला शोक करण्याशिवाय पर्याय उरत नाही..