Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

सायलेंस - नेहा लिमये

$
0
0

"Silence is the most powerful scream" - नेहाच्या नुक्कड गोष्टीवर मी आणखी काही बोलायची गरजच नाही...हे माझे सुद्द्धा तत्व आहे..जिथे तर्काचा शेवट होतो..तिथे शांत राहावे....कारण....

नेहा जियो.....

विक्रम

सायलेंस - नेहा लिमये

आजकाल office मध्ये शिरताना एक विचित्र ताण असायचा तिच्या मनावर.....

तसं बघायला गेलं तर त्याचे न तिचं बरं जमायचं एकत्र काम करताना. तो महत्वाकांक्षी आहे, त्याला त्याच्या पुढे पुढे केलेलं आवडायचं...त्याच्यातल्या अहंकाराला गोंजारल की तो तत्पर असायचा मदतीला ....हे तिला पक्कं ठाऊक होतं. त्यात तो बॉसचा लाडका...हे ही ती जाणून होती. आपलं काम बरं आणि आपण बरं असं तिचं वागणं होतं. त्यामुळे तिला तो जास्त किंमत द्यायचा नाही....तिलाही त्याच काही विशेष वाटायचं नाही. असतो एकेकाचा स्वभाव, म्हणत ती सोडून द्यायची आणि कामात झोकून द्यायची स्वतःला. पण जेव्हापासून तिला एका महत्वाच्या प्रोजेक्ट साठी निवडलं गेलं आणि त्यात तिच्या कामगिरी बद्दल तिचं विशेष कौतुक झालं...तसं तिला हळू हळू जाणवायला लागलं.....तो बदलतोय. तिला येता-जाता टोमणे मारणं, सहकार्यांना तिच्या विरुद्ध चिथावणी देणं, तिच्याशी मुद्दाम तोडून वागणं, office च्या कार्यक्रमात तिला अनुल्लेखानं टाळणं.....तिला त्याच्या या तऱ्हा नवीन होत्या असं नाही...पण तिला हे आतून तुटत जाणं कळत नव्हतं......शेवटी तर त्याने बोलणच बंद करून टाकलं......तिने आपल्या परीने खूप प्रयत्न केला परत सांधायचा......पण ती थकली.......

शेवटी, एखाद्याने मनाचं दार बंद करायचं ठरवलं तर त्यावर कितीही थापा मारा...उपयोग शुन्य !!! तेच दार जर किलकिले असेल तर जरा मनात डोकावून तरी बघता येतं समोरच्याच्या आणि पुढे सुधारण्याला आशा तरी राहते. तिने मग तो नादच सोडून दिला. पण तरीही कधीतरी एकमेकांसमोर येताना, मीटिंग मध्ये......तिला जाणवायचा...हा आपल्याला खाली खेचायला बघतोय.....नुसतीच असूया नाही ही, त्याला आपलं अस्तित्वच खुपायला लागलंय....या office मध्ये . काय याचं घोडं मारलंय आपण....का असं वागतोय हा....ती विचार करत राहायची.

हळू हळू office मध्ये सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं पण जो तो आप-आपल्या व्यापात दंग. कोण बोलणार ? बॉसलाही थोडीशी कल्पना आलेली पण त्याला targets जास्त महत्वाची...म्हणून तो ही कुंपणावर बसलेला.

कितीतरी दिवस ती स्वतःशीच झगडली, चिडली, भांडली, रडली सुद्धा...काय करू मी आणि कसं पटवून सांगू त्याला...मला तुझ्याशी काय कोणाशीच स्पर्धा करायची नाही...मी माझ्या वाटेने जातेय...तुझ्या वाटेत मला यायचं नाही...

पण मग तिचं तिलाच उमजलं...का आपण त्रास करून घेतोय...आपल्या परिघात तो नाहीये, नसायलाच हवा...त्याचं अस्तित्व का लादून घेतोय आपण आपल्यावर..सगळ्यांना सुखी ठेवायचा का आटापिटा करतोय. या परिघाबाहेरही जग आहे..आपलं, हक्काचं. आपण आपलं परीघ वाढवायला हवा....त्याला विरोध नाही करायचा पण सहनही नाही करायचं....Just let it go !!

एक दिवस ती नेहेमीप्रमाणे चहा घ्यायला pantry मध्ये आलेली...आणि अचानक तो समोर आला...तो तिकडे घुटमळत राहिला....बहुतेक ती काहीतरी बोलेल...तिच्या नजरेत असहायता दिसेल..या आशेने.

तिने हे तिच्या पाठीवर खिळलेल्या डोळ्यात वाचलं.......शांतपणे आपला कप उचलला आणि जणू काही तो तिथे नव्हताच अशा आविर्भावात ती तिच्या डेस्क वर गेली. तो बघतच राहिला................

तिच्या डेस्क वर तिने प्रिंट काढून लावलेलं........."Silence is the most powerful scream".... आणि ती झपाटून कामाला लागली.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>