व्यक्तिचित्रण किती महत्वाचे असते...आणि मानवी मनाचा तळ किती अथांग असतो...ह्याचे द्योतक आहे ही कथा...
उमेद्सिंह - मयुरा रोहित खरे
उमेदसिंह ह्या ढाब्यावर खूप जुना होता. घरून पळून आलेल्या मुलाला ह्या ढाब्याने आसरा दिला आधी फक्त पाणी देण, टेबल पुसण, तिथून वेटर, मग कूक. पुन्हा एकदा वय झालं म्हणून ऑर्डर घेणारा वेटर असा त्याचा प्रवास होता.
मालकाचा विश्वास होता . मालकाचा मुलगा विरोधात होता त्याच्या की उमेद म्हातारा झालेला उगाच पोसाव लागतंय म्हणून..जुना मालक जितके दिवस तितकेच दिवस तो नोकरीवर असणार होता!!
एका रात्री ढाब्यावर एक पंधरा सतरा वर्षांचा मुलगा आला. चार पाच दिवसांपासूनचा उपाशी, घरातून पळालेला.
उमेदला अंधुकसा भूतकाळ आठवला. त्याने त्या मुलाला नाव विचारलं . रामसिंग म्हणालं पोरं. उमेदनं त्याला जेवायला घातलं . दुसऱ्या दिवशी नव्या मालकासमोर त्याला घातलं. नव्या मालकाला नवीन विश्वासू हवाच होता. त्यानंही लगेच विश्वासाने रामसिंगला ठेवून घेतलं. एकदम त्याचा उद्धटपणा झाकला गेला. सगळ्यांमध्ये त्याच्या बद्दल आदर निर्माण झाला. पुण्य लाभलं ते वेगळं. रामसिंगनं सुद्धा मेहनत घेऊन लवकरच पाणक्या ते वेटर ह्या पायऱ्या पार केल्या. उमेदनं थारा दिला, अन्न दिलं, म्हणून फार फार भक्ती त्या आजोबांवर रामसिंगची. ळूहळू सगळं काम शिकायचं, उमेद आज्याला काम बंद करा सांगून एक खोलीत त्याची सेवा करायची अशी स्वप्न तो बघायला लागला. अजून वय नसलं तेवढं तरी एक दिवस लुगाई आणायची, मुलं वाढवायची अशी पण स्वप्न त्याला लाजत लाजत पडत.
एक दिवस एका दारुड्या गिऱ्हाईकाला रामसिंगनं चांगलं मारलं आणि तरी संताप कमी झाला नाही तर ढाब्याच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या हौदात जाऊन बसला, तर नव्या मालकानं त्याला बाहेर ओढून त्या गिऱ्हाईकला खुश करायला झोडून काढलं; असं उमेदसिंगला कोणीतरी सांगितलं. उमेदनं त्या रात्री रामला बोलावून घेतलं. लेकराला रडतांना बघून उमेदला दया आली. त्यानं दारूची बाटली उघडली रामसिंग पियो करून पुढे ठेवली. रामसिंगच्या डोळ्यात रक्त उतरलं ती बाटली पाहून. त्याने ती उचलली न दरवाज्यावर फेकून फोडली.
"यही साली कारन है जो बाप से भाग के आया. साला रोज पिता था पिटता था."
"दद्दा मार खानेका दुख नही. बाप ने बहुत पिटा है, मालिक ने क्यू मारा??? हमने तो कोई गलत काम नही किये थे!"
उमेदसिंगला एक कळ आली!
त्याने सांगितलं,
"बेटा तुला काय वाटलं? मला सगळं सुखानं मिळालं?? नही!!ऐसा नही होत है रे बिटवा!! मैने भी बहुत लाथे खायी है! “
रामसिंगला त्याने मांडीवर जुन्या मालकाने जळत लाकूड फेकून मारल्याने पडलेला डाग दाखवला! रामसिंगच्या काळजात जणू भाजलं. त्याला खूप राग आला. उमेदसिंग त्याला म्हणाला,
“बेटा मैने बहुत टेम कोसिस की के यंहा से चले जाई. लेकीनं निकल नही पाया!! सारी हड्डी मालिक की गुलामी मे गल गयी. थारे साथ ऐसा नही होणा चाहिये. तू यंहा से चला जा! नया काम मिलही जायेगा! राम तू मेरी बात मान!
रामसिंगला समजावत रात्र सरली. दुसरा दिवास उजाडला.
खोलीतून बाहेर जाता जाता रामसिंग म्हणाला,,
"दद्दु एक बात ध्याण मे रखो ,
कागा कुत्ता कुमाणसा, तीन्यूं एक निकास। ज्यां ज्यां सेर्यां नीसरै, त्यां त्यां करे बिनास॥“
उमेदसिंग बघतच राहिला! जेव्हाही रामसिंगला नवीन मालक रागवयाचा मारायचा रामसिंगच्या कपाळाची नस तडकायची पण कोणते बंध त्याला इथे बांधून होते काय माहिती.
एक वर्ष सरलं. उमेद रामला निघून जा सांगतच राहिला. इथे राहू नको. पाय अटकवू नको. मी सांगतोय न तू ऐकतच नाहीयेस. मालकासाठी आपण फक्त इमानी कुत्ते असतो. विश्वास, जुना सहकारी वगैरे सब झूट. पालतु कुत्ते असले की घराला बरं पडतं. एवढीच आपली लायकी. पण रामसिंग काही जाईना. दोन तीन दिवस डोक्यात राख घालायची. छोट्या मालकाने राम रामा अशी प्रेमाने हाक मारली की विरघळायचं. उमेद त्याला बोल बोल बोलायचा. उमेद ची हिम्मत संपली.
आणि एक दिवस रामसिंग पासून लपवून उमेदसिंग ने भरपूर ढोसली.
तो हरामी कुत्तेका पिल्ला पिऊच देत नाही. भोसडीका ऐसे दद्दा दद्दा बोलता है के सच मैं वो मेरा खून हो! एक घाणेरडी कल्पना त्याच्या मनाला शिवून गेली न तो कल्लेदार मिशी असणाऱ्या गालात हसला!
डुकरासारखा दारूच्या नशेत लोळतच होता की माणसं उठवायला आली.
"ओह बापू तो तुझा रामसिंग छोट्या मालकाचा हात तोडून टाळक्यात दगड घालून पळून गेला! बरंय घाव जिव्हारी नाही लागला! मेलाच असता नाहीतर. ऍडमिट केलंय दवाखान्यात.पण खरं नाही काही त्याच! खाडकन दारू उतरलेल्या उमेदसिंगनेनं पचकन थुंकत म्हणलं "हरामी साला!"
तीन दिवसांनी छोट्या मालकाच्या मृत्यूची खबर आली.
सगळे गेले बंगल्यावर मालकाच्या
थोरला म्हातारा मालक उमेदसिंगला बघताच त्याच्या गळ्यात पडून ओकसाबोक्शी रडू लागल
मालकाचंन आपल्या आवडत्या वडील माणसाचं प्रेमळ नात बघून बाकीच्या कामगारांना भरून आलं. मालकाच्या पाठीवरून हात फिरवता फिरवता उमेदसिंगच्या मनात आलं,
"भोसडीचे माझी जागा घ्याला बघत होते!
एक आता कायमचा झोपला. एक जीव मुठीत धरून आयुष्यभराचं ओझं घेऊन फिरणार",
आणि मिशीतल्या मिशीत तो हसला.