प्रतिमा पाटील...आपने क्या लिख दिया...शाब्बास...!!
विक्रम
विश्वास - प्रतिमा पाटील
मनातलं सगळं व्यक्त केल्यावर तो म्हणाला, “मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. पण तू इतरांसारख नाही न करणार आम्हाला?“
तशी फुटपाथवरच्या त्या बेंच वरून ती उठली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्कुटीला चावी लावली, गाडीवर बसत गाडीला किक मारली.
ती न बोलता जातेय हे पाहून तो हतबल झाला. दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला त्यानं…कोलमडलाच होता तो. तशी ती पुन्हा त्याच्या जवळ आली. खांद्यावर हात ठेवतं म्हणाली,
"सावत्र असलास तरी भाऊ आहेस याची जाणीव आहे मला.तुझ्या बाबांनी आम्हाला विश्वास काय असतो याची जाणीवच दिली नाही रे कधी. तेव्हा विश्वास काय असतो ते नाही माहित मला, पण मला घात नाही करता येत हे नक्की! जा तू आता शांत मनानं. येईल माझी आई".