वरवर पाहता ही नुक्कड कथा अनपेक्षित वळण घेणारी विनोदी कथा वाटेल...पण जरा थांबलो तर आपल्या समाजातला एक विलक्षण आणि अमर्यादित पुरुषी अहंकार आपल्याला जाणवल्या खेरीज राहणार नाही...
"इसलिये मैने इसको प्रेग्नन्सी रख दी."
विक्रम
अजब गजब - प्रा. डॉ. ललित विठलाणी
सुट्टीमध्ये आमच्या गावी गेलो की अनेक पेशंट जणू वाटच पाहत असतात, दिसले डॉक्टर की लगेच दुखणे सांगणार. ह्या गोष्टीची आताश्या सवय झालीये म्हणा, पण भर रस्त्यात शर्ट वर करून काखेतील गाठ दाखवणे जरा अतीच वाटते नाही? (नशीब त्या गृहस्ताला पाईल्सचा आजार नह्वता.).
ह्या वेळेस एका व्हेटरनरी डॉक्टरने (गावाकडे व्हेटरनरी डॉक्टरला ‘ढोर डॉक्टर’ म्हणतात) अस्मादिकांना अगदी सकाळी घरी बोलावले व आपल्या बायकोच्या आजाराविषयी सांगू लागला. . –
तो - बोलेतो “ललित, तेरी भाभी का हेमोग्लोबिन बहोत कम रहेता है. दिवाली के टाईम पे जब दवाखाने मे लेकर गये थे, तो बटे साडे चार ग्राम हीच भरा”.
मी- “ओह , फिर क्या किया. ब्लड लगाया की नही?”. .
तो- “हा, दो बाटल ब्लड लगाया. फिर भी दो महिने मे फिर से कम हो गया. मेरेकू तुरंत ख्याल आया, इसका ब्लड एम. सी. मे जादा चले जाता ना, इसलिये कम हो जाता होगा. इसलिये मैने इसको प्रेग्नन्सी रख दी. कम से कम नौ महिने तो ब्लड लॉस नही होगा. . लेकीन फिर भी हेमोग्लोबिन बढ ही नही रहा. अभी पाचवा महिना चालू है और फिर भी सिक्स ग्राम हीहै”. .
घरी येवून सहज बायको ला विचारले, “तुझ हेमोग्लोबिन किती आहे ग?”