खूप गहिरी वेदना आहे ही...
अढळ – स्वाती धर्माधिकारी
आपल्या लहानगीला गोष्ट सांगता सांगता ती थबकली, धृवबाळाच्या अट्टाहासाची कथा निदान छोटीला सांगूच नये असं तिला वाटलं,अगदी मनापासून!
नकोत्या, अशक्य, अप्राप्य गोष्टींचं असं बाळकडू देऊ नये, वाताहत होते मनाची त्यांच्या मागे धावतांना. अढळपद? ओह माय फूट! किस चिडीया का नाम होता है यह?
आरशात प्रतिबिंब न्यहाळतांना नकळत ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा तिनी ओढणीने टिपल्या आणि ध्रुवपदाची आशा सोडून देऊन, परिस्थितीशी झुंजणाऱ्या तिच्याकडच्या मोलकरीणीची गोष्ट छोटीला सांगायला सुरवात केली!