ओहो....एक तरल फरक किती सुरेख स्पष्ट केला आहे...शिल्पा ने...
विक्रम
एकटी - शिल्पा गडमडे
‘ही मुलगी एकटीच जेवायला आलीय रेस्टॉरंटमध्ये? मला तर असं एकटं येण्याची कल्पना करणंही अशक्य आहे. एकट्याने यायचं तर सोडाच’.. कितीतरी वर्षापूर्वी ती त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला आल्यावर असं काहीसं बोलली होती..
आज ते दोघे पुन्हा त्याच रेस्टॉरंटमध्ये आले आहेत जेवायला..योगायोगाने आजदेखील अशीच एक एकटी मुलगी जेवतेय समोर..तिच्या मनात विचार सुरु आहे..
’कुणीतरी सोबत असताना देखील एकटं वाटण्यापेक्षा त्या मुलीसारखं एकटं असणं बरं..............