Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

खर-खोट-Mayura Khare

$
0
0

मयुराने खोट बोलायच्या सवयीबद्दल सुद्धा एक सहानुभूती उत्पन्न केली आहे..हे तिचे यश आहे.

खर-खोट – मयुरा रोहित खरे

मध्ये मध्ये मला खूप खोटंच बोलावं वाटायचं. खूप म्हणजे खुप्पच!! म्हणजे आईनी विचारलं की,

का ग उशीर झाला कॉलेज मधून यायला?? तर साधं मैत्रिणीशी बोलत बसलें, असं सांगता येत ना; पण मी सांगायचें, सायकल पंक्चर झाली.

मैत्रिणींनी विचारलं,

अभ्यास झाला का? मी सांगायचे, नाही पाहुणे आले होते!

नंतर मला अपराधी वाटायचं. एकदा माझ्या एका मैत्रिणीला मी विचारलं,

काल का नव्हती आली?? ती म्हणाली,

ग त्या दुसरीला काही काम होत घरी आम्ही सोबत येतो ना म्हणून.

मी चटकन म्हणले,

कशाला आली होती की ती!

ती चिडली

“आली होती??? मग माझ्याशी का खोटं बोलली??”

न तिने जाब विचारला दुसरीला!! ती दुसरी म्हणाली,

चल घरी माझ्या आईला विचार; ही काहीपण सांगते.

त्या दोघींनी मला पकडलं म्हणल्या, तुझ्या सद्सद्विवेक बुद्धीला विचार एकदा; माझी ही बुद्धी ऍक्टिव्ह असते तशी. कॉन्स्टंट bickering actually. पण मी सायकल चालवता चालवता आठवून पाहिलं तर तसच घडलं होत हो. मैत्रिणी मला असं का बोलल्या?? त्या सोबत झाल्या न मला व्हिलन केले.

बाबांनी एकदा विचारलं, आई गेली का बाजारात?? मी पापणी सुद्धा न फडफडवता म्हटलं

नाही..कोण काका आलेले त्यांच्या सोबत गेलेली.

बाबा गोंधळात पडले. आईला आल्यावर म्हणले, कोणी लिफ्ट दिली तुला?? आई म्हणाली

लिफ्ट!! नाही बा मी तर रिक्षेने गेले. नंतर दोघे मी काही बोलले की चार वेळा वेगवेगळ्या तऱ्हेने विचारायचे. इतका राग यायचा ना!! सारे आपले खोटे लपवायला मला खोटं ठरवत होतें. नंतर नंतर सगळेच मला विचारायला लागले, हे खरंय ना? तुझं काही खर नाही!

मग कॉलेजला एक आवडला मला; खूप वर्ष आम्ही सोबत होतो... नाही. सॉरी खोटय ते! दोनच वर्ष आम्ही सोबत होतो. कॉलेजच्या शेवटी शेवटी तो म्हणाला,

“मी तुझ्यावर प्रेम करतो!! तू करतेस ना???

मी म्हणले,

“हो करते की!!

तो म्हणाला,

“खोट बोलतेयस ना??”

मी हो म्हणले.... का???? माहिती नाही!! अन तो कायमचा निघून गेला!! त्या नंतर मी बोलतच नाही.. खोटं पेक्षा न बोललेलं बरं!!!

मग दिसला मला टक्कल, दोन मुलं बायको, हातात काठी होतीaccident झाला असावा. तुम्ही काय ओळख करून देणार ना?? त्याने करून दिली. म्हणाला,

“तू केलंस ना लग्न?”

मी म्हणले,

“हो!! आज नाहीत सोबत! मिल्ट्री retired आहेत. दोन जुळी मुलं आहेत”.

त्याने संशयाने पाहिलंच. पण बसला त्याचा विश्वास. बसणारच ना. आहेच खर. मग घरी आले. कुलूप उघडून रिकाम्या घरात. क्षणभर आश्चर्य वाटलं गेली कुठे मुलं?? मी तर लग्न संसार मुलांच्या जन्माच्या कळा, त्यांचं मोठं होण, ह्यांचं retired होणं सगळं अनुभवत घरी आलेले.

कधीकधी खोटंच बरं वाटतं. जगता तरी येते त्यात. असो!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>