हां प्रसंग ओळखीचा वाटेल...अगदी असाच नहीं...पण मदत करायची तर निदान विचारून करावी...आपल्या मनाने करू नये..ही किमान अपेक्षा असायला काय हरकत आहे?
विक्रम
क्षमा - संगीता गजानान वायचळ
तिला घाई सकाळची ...9:30 ला निघायचय..धडपडत सकाळच्या नास्त्या साठी इडलीसांबर तयार करता करता ...एकीकडे स्वयंपाक आणि स्वतःचा डबा केला तिने...
आज जरा लवकर झालं म्हणून खुश ती...डब्याची पिशवी ही तयार केली तिने ....आणि पळाली आंघोळीला....
........
तेवढ्यात कामवाली बाई आली...आणि मंदिरातून आई.......कामवालीला भांडी द्यायची म्हणून ...भरून ठेवलेला डबा गाईला लावला आणि घासायला टाकला ....
न विचारताच मदत म्हणून काम करायची आईंची सवय ...विचारून करायचे म्हणजे इगो आडवा येतो...
आणि रोजच्या या सारख्या घटनांनी तिची तारांबळ अधिकच वाढते …..
पुन्हा एकदा सकाळची घाई..कुकरची शिट्टी..भाजीची फोडणी..कणकेचा गोळा..एकीकडे हात भरभर चालतात नि विचारही....
"मनाला जीवनसत्व देणारे कुकर, भाज्या, कणिक कुठे मिळते देवा .....?"
तो म्हणतो...
"क्षमाशिलतेत "