Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

पाऊस-शर्मिला रानडे

$
0
0

शर्मिलाची ही चौथी कथा....महत्वाची...अर्थगर्भ....

पाऊस-शर्मिला रानडे

अखंड पडणारा पाऊस खिडकीतून बघत असताना कामाक्षीला निराशा दाटून आली. एखादा करुण सूर लागावा तशी संततधार ........इतक्या भेसूर वातावरणात देखील रोजची धाव पळ न चुकवत कुकर शिट्या मारू लागले आणि बखोटीला बाग मारून लोक लोकलच्या दिशेने धावू लागले... तिला वाटले हे एक चित्र आहे...कधी ही न बदलणारे.. फ्रेम मधेच अडकून पडलेले.. आपण ह्यातले नाहीत, निशितच नाही.

अशीच तंद्रीत खिडकीशी बसलेली असताना देवदत्तच्या आवाजाने तिला चाळवले,

********"अगं, जाऊयात ना आपण जगजीतच्या concert ला? मी येताना तिकिटे घेवून येतो..

******* नको रे देवदत्त, आज अगदी कंटाळा आलाय. कुठेच बाहेर जायचा मूड नाहीये.

देवदत्तच्या कपाळावर अठी उमटली..हल्ली कमा फारशी उत्साही नसते. तिचा मूड बऱ्याचदा नेहमीसारखा नसतो. तरी देखील त्याने काही म्हणायचे टाळले आणि तो बाहेर पडला. कमा मात्र हिरमुसली होऊन खिडकी बाहेर बघत राहिली...

तिला आठवले तो प्रेमात पडल्याचे दिवस....तिने जणू मोहिनी केली होती त्याच्यावर. वरळी सी फेस वरचे long walks, पावसाळ्यात उंच लाटांचा मारा झेलत, एकाच कागदातून खाल्लेली भेळ, हातात हात घालून समुद्राकडे निश्चल बसून राहताना तिला भोवतालचा पडलेला विसर .. खरच, किती मंतरलेले दिवस होते ते! सगळा भूतकाळ काही वर्ष तरी विसरला होता.. देव तर तिच्या आकंठ प्रेमात होता..तो अगदी फुलासारखा जपत असे तिला...

********** खरं तर आता तरी असं काय बदललंय? कमाला वाटले.

अजूनही देव तिच्या तितकाच प्रेमात आहे.. अन त्याची प्रचीती तो वेळो वेळी देत असतो... कधी तिच्या करता फुले आणून, कधी काही छोटीशी भेट वस्तू..त्याला ती सतत अवती भोवती हवी असते. एखाद्या लहान मुलासारखा कधीकधी तिला तो वाटतो. तिचे ही अतोनात प्रेम आहे देववर.. पण तिला आता स्वता: मधला झालेला बदल मात्र प्रकर्षाने जाणवू लागलाय. आपल्या पूर्वीच्या जाणीवा निश्चितपणे बोथट झाल्याची जाण तिला आहे आणि त्याचा तिला त्रास ही होतोय.

का व्हावे मला असे? मी हल्ली का त्रासावते त्याच्या सततच्या सहवासाने...तिला उत्तर मिळेना..

अशा विचारांच्या भोवऱ्यात असताना अचानक फोनची रिंग वाजली. कलाने बाजूला पडलेला फोन उचलला. तिला वाटले, देवचाच असणार. काळजी वाटत असेल त्याला आपल्या बदललेल्या मूडची.

पण हातात घेवून बघते तर....सत्यजित! कॉलेज पासूनच आपला मित्र..जवळचा म्हणावा असा...ज्याच्याशी काही खासागीतले पण बोलले जाऊ शकते असा.

*************हेलो, कशी आहेस मुली?

तो नेहमी तिला असेच संबोधत असे.

*********मी "just about ok"..

अरे काय मस्त हवा पडलीये...एक कप अद्रक की चाय हो जाय, क्युं? नेहमीच्याच उत्साहात सत्यजित म्हणाला.

*** अरे ये ना..मी टाकते चहा. कामाक्षी उठली.

दोघेही चहा घेवून बाल्कनीत येऊन बसले.

*** काय रे आज कामाला सुट्टी कि काय? कामाक्षी

****आज अशीच बाहेरची कामे काढली अन म्हटलं तुझ्या बरोबर गप्प माराव्या ...खूप दिवस साचलेल्या..

कामाक्षी ला अगदी बरं वाटल ऐकून. तिलाही कोणाशी तरी खूप आतून आतून बोलायचं होतं.

**** सत्य, हल्ली कधी कधी फार उदास वाटते रे...कशात लक्षच लागत नाही...कशाची ओढ नाही, उत्साह नाही...असे वाटते जगण्यचा हेतूच संपलाय कि काय...

*****अगं काय वेडी आहेस का काय...एव्हडी सारी सुखं हात जोडून उभी आहेत तुझ्या समोर..घर, गाडी, पैसा-लत्ता, कोणाला हेवा वाटेल असा प्रेमळ, समजूतदार, यशस्वी नवरा... काय कमी आहे तुला?

**** अरे तसं नाही रे..ते सगळं मान्य आहे मला, आमचं एकमेकावर खूप प्रेमही आहे..

तो अतिशय समजूतदार, भावूक, dependable, predictable असा आहे.. "an ideal man" in an eutopian marraige... but it’s boring......ideal can be insipid...isnt it? आता कुठेतरी पुन्हा भूतकाळाशी जोडले जावे असा वाटत...जुने दिवस, जुन्या मित्र-मैत्रिणी, स्वातंत्र्य..सगळं काही पुन्हा भोगावं, परत त्याच उत्कटतेने अन नव्या जाणीवेने...असं होऊ शकत का सत्य? का एका नवीन नात्यात सगळी जुनी नाती ओलांडूनच यायचं असतं ?

कला, तुझा रोख आदित्यकडे तर नाहीये?

नाही सत्य ....आता पूर्वीची नाती बदललीयेत..ते आकर्षण, ओढ आता फक्त आठवणीत..पण आता एक माणूस म्हणून, मित्र म्हणून काही नाती नाही का जपता येणार? मला वाटते सत्य, एका स्त्री आणि पुरुषा मधले नाते हे आकर्षणानेच सुरु होते किंवा Romance हा त्यातील अटळ भाग असतोच..निसर्ग नियमा प्रमाणेच. पण एकदा का ते दिव्य ओलांडले की उरते निखळ मैत्री नाहीतर पराकोटीचा दुरावा..मग त्यातले मैत्र मला का न मिळो?

****कामाक्षी तू म्हणते ते अगदी पटतंय मला... पण तुला खात्री आहे की तुला फक्त मैत्रीच हवी आहे..

कामाक्षीला ह्याचे उत्तर ठाम पणे देता आले नाही..

अर्थात, तू जर थोडी बाहेर पडून शक्यता अजमावालीस तर ह्याची कदाचित उत्तरं मिळतील तुला...मात्र त्या आधी ह्या सगळ्यावर एकदा देवशी बोल..

** चल मी पळतो, काही कामे उरकायची आहेत अजून. सी यु!

असे म्हणून सत्य निघून गेला... कामाक्षीच्या डोक्यातील गोंधळ अजूनच वाढवून..!

देव यायच्या आधी तिने उठून सगळे घर आवरले. स्वताही छानशी तयार झाली . तिला आता थोडे फ्रेश वाटले. आपण आता यावर नक्की देव शी बोलायचे असे ठरवून ती देव ची वाट पाहू लागली.

देव परत आला तो नेहमीच्याच उत्साहाने...कमाला वाटले काय ही दैवी शक्ती आहे ह्याच्यात काय जाणे..सतत आनंदाने भारलेला...ह्याला कधी चीड, कंटाळा येत नसेल काय? तिने त्याच्यासाठी गरमगरम उपमा आणि आल्याचा चहा केला..बाहेर आभाळ भरून आले होते.. आता कुठल्याही क्षणी कोसळेल हा पाऊस..

पाऊसाची अनेक रूपे होती कमाच्या मनात...लहानपणीच्या कागदी होड्यांचा पाऊस, कधी अल्लड प्रेमाचे भरते घेवून आलेला...कधी धूवधार सिंहगड वरचा, कधी होस्टेल रूमच्या खिडकी बाहेरचा...आई बाबाच्या आठवणीत चिंब भिजलेला तर कधी अगदी करुण...काहीतरी कायमचे गमावल्याची सल देणारा....

उद्याचा पाऊस ह्या पेक्षा काहीतरी नक्की वेगळे घेऊन येणार असे कमाला वाटले. तिने देवचा रोख पाहून बोलायचे ठरवले.

***** देव , तुला कधी कंटाळा येत नाही का रे?

***** नाही कमु, कंटाळा यायला वेळ तर पाहिजे ना...मला वेळच कुठाय ग?

********* अरे तसं नाही...तुला ह्या सगळ्या रुटीनचा, माझा, त्याच-त्याच गोष्टींचा वीट येत नाही का?

******नाही बाबा, वीट कसला..आता पोट-पाण्यासाठी नोकरी ही केलीच पाहिजे...तू माझी बायको आहेस तेंव्हा तुझा कंटाळा येऊन चालणार नाही...('केलेच पाहिजे', 'चालणार नाही'...हा straight acceptance कमाला अजिबात रुचला नाही... काहीतरी ठरवून दिलेले किंवा पदरी घेतलेले आयुष्यभर करतच राहीचे का? दुसऱ्या कुठल्या शक्यता अजमावायाच्याच नाहीत का? कलाला चिडच आली)

**** का ग, तुला माझा कंटाळा आलाय की काय?

देवाने रोखून तिच्याकडे बघत विचारले

*** नाही, कंटाळा तुझा आला नाहीये...पण ह्या routine चा मात्र निशितच.

ok- देव

मग काय करायचे ठरवले आहेस?? नोकरी, business , एखादा छंद वगैरे??

*** नाही रे..मला असा वाटत, सगळ्या जुन्या मित्र-मैत्रिणीशी पुन्हा एकदा जोडले गेले पाहिजे..असा वाटत भूतकाळाची नाळच तोडली गेलीये की काय..संसार एक संसार करत बसलीये मी..मला परत स्वछंदीपणे जगायचं..तरुण व्हायचंय..

*** म्हणजे नेमकं काय करायचं..?

कमाला ह्याचे उत्तर देता आले नाही अन मग तिला एकदम असहाय वाटले..तिने स्वता:शी विचार केला तेंव्हा तिला जाणवले की तिला काय नकोय हे माहित आहे पण काय हवेय हे कुठे ठावूक आहे?

*** मला हवंय तसं मी जगणार उद्यापासून...मला कुठलीही चूक-बरोबर, चागलं-वाईट, वयाला आणि married status ला साजेसा वगैरे परिमाणाच ओझ उतरवून जगायचं...

**** ओक

देव हसत म्हणाला..

परत एकदा तिला त्याच्या समजूतदार पणाची, चांगुलपणाची चीड आली...ह्याला काहीच कसे वाटत नाही..असूया, द्वेष...किती अमानवी आहे हे सगळं...तिला वाटल.

***काय प्रेमात वगैरे पडलीयेस काय? त्याने जवळ येत विचारले.

*** नाही..पण पडू शकते

तिने ती शक्यता नाकारता येऊ नये ह्याची काळजी घेतली.

आता उद्या आदित्यला फोन करायचा अस ठरवून ती झोपी गेली.

दुसरा दिवस उजाडला ती एक सोनेरी सकाळ घेवून...कालचे मळभ दूर सरले होते आणि स्वच्छ, कोवळे उन पडले होते..देव ऑफिसला गेल्यावर कमाने सावकाश आपले आवरले. तिने आदी ला फोन लावला...

***** आदित्य here......तोच आवाजातला करारीपणा. कमाला ओळख पटली.

*** कशी आहेस ग? किती दिवसांनी?

*** हो ना. मी मजेत. कधी भेटूयात?

तिने सरळ प्रश्नाला हात घातला.

संध्याकाळी कमा ने देवला फोन करून आदीला भेटायला जाणार असल्याचे कळवले.

ती taxi घेवून पृथ्वीला निघाली. जाताना का कोण जणे, तिला थोडी अपराधीपणाची भावना आली...पण आपण चूक तर काहीच करत नाही आहोत...शिवाय लपवून पण नाही.. तिने असल्या विचारांना दूर सारले. एक अनामिक अशी हुरहूर होती तिला..तिने परत आरशात पहिले...आपण अजूनही पूर्वी इतक्या आकर्षक दिसतो तर...आयुष्य भरकन १५ वर्ष मागे गेलं..आदी कसा दिसत असेल? पूर्वी सारखा? दाट केस? दाढी, कायम ओठांवर असलेली सिगरेट...तेंव्हा तिला तो एकदम intellectual type वाटत असे. थोडासा बेफिकीर, ...नाटकांच्या तालमीतली त्यांची discussions , रात्रीरात्री जागून केलेली तालीम, आणि मग stage वरचा रोमांचक अनुभव....त्या नंतर कित्येक दिवस त्या characters च्या धुंदीत घालवलेले दिवस... सगळसगळं नजरे समोर आले. कित्येक तास ती आणि आदी theater मागच्या कॅन्टीन मध्ये चहा पीत गप्पा मारत बसत. रात्र उलटून गेली की आदी तिला पोचवायला घरी येई...परत तिथेही त्यांच्या गप्पा रंगत...कुठेतरी..कमा च्या मनात आदी विषयी ओढ निर्माण होत गेली ...तिला खात्री होती की आदीला ही आपण आवडतो..

असेच धुंदीत दिवस जात राहिले...आता कमा ला वाट होती ती आदीने व्यक्त व्हायची.... एक दिवस आदी आला तो हंसाला घेवून..त्याची NSD मधली मैत्रीण. तिची वेगळी ओळख करुन द्यायची गरज पडली नाही..

त्या रात्री कमाला खूपखूप एकटे वाटले. इतके दिवस हातात घट्ट असलेला हात एकदम निसटून जावा..तसे काहीसे.

सगळं भोवताल अंधुकअंधुक दिसायला लागले.

**** madam, पृथ्वी आ गया..

**कमा ने डोळे पुसून पैसे दिले.

कित्येक वर्षांनी आज आपण पृथ्वीला येतोय...माणसाचे आयुष्य असे तुकड्या तुकड्यानी च जोडलेले असते काय?.... एक तुकडा लग्न आधीचा, एक नंतरचा.....निदान आपल्या बाबतीत तरी हेच खरे..तिला वाटले.

ती पृथ्वीच्या कट्ट्याशी गेली अन आदी कुठे दिसतोय का ते पाहू लागली..तोच मागून 'कामी' अशी ओळखीची हाक ऐकू आली..तोच आवाज ,धीर गंभीर. कायमच कुठल्यातरी भूमिकेत असल्यासारखा...तीच चालण्याची लकब...तिला वाटले की पुढे होऊन त्याला घट्ट आलिंगन द्यावे...पण आदी मात्र पूर्वी सारखाच..थोडासा अलिप्त, moody ,...म्हणूनच अधिक आवडणारा..

तो छानसा हसला..निखळ अगदी पूर्वी सारखं...

***** कशी आहेस ग वेडी? आदी असे म्हणताच तिला अगदी उचंबळून आलं....अजूनही काही धागे बाकी आहेत मागे असेच वाटले.

दोघेही आईरीश कॉफीचे प्याले घेवून कट्ट्याशी बसले.

**** बोल, काय चाललंय आयुष्यात? काय करतेस? तू खूप काही achieve केलं असशील ना आता पर्यंत.

आदी म्हणाला...

ह्याचे उत्तर काय द्यावे कमा ला कळेना...ती भांबावल्यासारखी त्याच्याकडे पहात राहिली.

*** काही नाही विशेष...कमा म्हणाली. तिला वाटले सांगाव का याला की आयुष्यातली किती वर्ष मी फक्त तुझा विचार करण्यातच घालवली..दुसरा काही करायचं राहूनच गेलं.

पण ती काही बोलली नाही..

तू खूप नाव कमावलस...खूप मोठा झालास... I am happy for you.

कमा म्हणाली.

अगं yes, all credit goes to Hansa..तिने माझ्यावर इतका विश्वास दाखवला, त्यामुळे मी इथवर पोचू शकलो. ती माझी सर्व काही झाली...एक मैत्रीण, प्रेयसी, पत्नी...पूर्णार्थाने.

मग आपण कोण होतो...की कोणीच नाही...? कलाला वाटले..सांगावे का ह्याला...तू माझ्या नावाने निरोप म्हणून ठेवलेल्या एका कागदाच्या तुकड्याला अजून जीवापाड जपून ठेवलंय ते? का हे सांगाव की तू तुझ्या नकळत माझा हात हातात घेतलास एकदा आणि मी किती दिवस तो धुतलाच नाही...ह्याला आठवेल का माझी अस्वथता? त्याचे पहिले व्यावसायिक नाटक यशस्वी होईल की नाही म्हणून? का हे सगळं तू गृहीतच धरल होतस? मी एक निमित्त मात्र होते का? का तू माझ्याकडे फक्त एक ओळख म्हणूनच पाहिलस? बाकी कुठल्याही शक्यतांचा विचार शिवला नाही का तुझ्या मनाला?

कमा ला वाटले विचारावे, पण ती गप्पच बसली.

तेव्हड्यात हंसा आली.. ती सुरेखच होती..अजूनही तरुण, आकर्षक. तिने ही औपचारिक चौकशी केली.

**** घेवून ये ना आदी हंसाला घरी..तुम्ही दोघे मस्त जेवायला या...

**** छे ग, कुठे जमायला इतकं...स्वत:साठी वेळ काढणं मुश्कील झालंय..त्यात आता, सिरिअल्स आणि एक-दोन हिंदी सिनेमासाठी बोलणी चालालीयेत..त्यात गुरफटून गेलोय..

आदी तुटकपणे म्हणाला.

**** आपण किती नाटक केली ना आदी?....काय दिवस होते ते!..तुला आठवतंय ना?

कमा अजूनही कुठे तरी त्याच्याशी जुळण्याचा प्रयत्न करत राहिली.

पण तिला जाणवले की आदीला फारस भूतकाळात स्वारस्य नव्हते..तो आता एक मोठा TV Star होता. त्याला एक खुणावणार क्षितीज होत..साथ देणारी सहचारी होती. आता तिच्या साठी आणि तिच्या मैत्रीसाठी कुठलीही जागा सहजी त्याच्या बिझी life मध्ये उपलब्ध नव्हती..तिला खूप खूप हताश वाटले...वाटलं ही भेट नसतीच झाली तर बरे झाले असते.. काही प्रश्न हे निरुत्तर राहिलेलेच बरे. परत एकदा आपला प्रेमभंग होतोय असं तिला वाटलं...आदी आपल्याला फक्त हेच देऊ शकतो, तिची खात्री पटली. अन ती घाईघाईने उठली

**** निघते मी

*** ok कामी ... Take care...

शेवटचे शब्द तिच्या कानापर्यंत पोचलेच नाहीत...हवेतच विरून गेले..

चालताना आपले पाय जड झालेत असं कामाक्षीला वाटलं. तिला घरी जाईची इच्छा होईना. तिने सत्यला भेटायचे ठरवले.

***** काय मग कशी झाली भेट?

सत्यने हसत हसत विचारले.

कमाला काही बोलण्याआधी रडूच फुटले.

***** चांगलीही झाली आणि वाईटही ...

सत्य, काही गोष्टी किती स्पष्ट असतात आपली नजरे समोर...तरीही त्यांची थेट उत्तरं मिळण्याचा आपला अट्टाहास का असावा?

***** कारण कुठेतरी जिवंत असलेली आशा.

-सत्य म्हणाला.

**** अर्रे पण आता इतक्या वर्षांनी कुठली आशा ठेवून मी भेटायला जाऊ शकते त्याला?

अगं, गैर समाज करू नकोस..सत्य म्हणाला.

मानवी मन हे फार अजब आहे, कमा ...A challenging subject for research! मी तुला एक प्रश्न विचारतो..तुला आदीबद्दल प्रेम होताच..पण त्यालाही तुझ्या बद्दल ओढ होती का?

कमा गोंधळली, पण ठामपणे म्हणाली.... होतीच ओढ सत्य...नाहीतर तो माझ्याशी इतका वेळ का व्यतीत करत असेल? ..त्याची सगळी tensions तो माझ्यावर सोपवून निर्धास्त होत असे.. अगदी जवळचा कोण असावा असं त्याच अन माझा नात होत..

**** तुझं अन माझ नात कस आहे कला? जवळचं अगदी जीवभावाच? आहे की नाही...?

*** हो आहे ना..पण...

कमा ला मधेच अडवत सत्य म्हणाला...

तुला कधी माझे अंतर्मन कळले का? तू कायमच माझी मित्र ह्या नात्यामधेच गणती केलीस ना.?

*** हो..थोडसं गोंधळून कमा म्हणाली.

अगं अगदी तशीच तुझी गणती एक मैत्रीण अशी आदीने केली...कमा ला काय बोलावे ते कळेना...

मला वाटते यात आदीचा काहीही दोष नाही..सत्य म्हणाला..You know कमा ...who is culprit?? Your own mind....अगं हा सगळा तुझा मनोव्यापार होता... हे कल्पनाविश्व होतं तूच उभ केलेल...ज्याला सत्याचा कुठलाच संदर्भ नव्हता...

नाही रे सत्य...इतका एकतर्फी असू शकत हे सगळ? मग ते एकमेकांना जपत एकत्र घालवलेले क्षण? बेभान होऊन केलेली नाटक? ते काय होतं?

***** ते...तारुण्य होतं, धुंदी होती...त्याचे फारसे अर्थ लावायला जायचं नसत कमा..जे तू करते आहेस...

कमाला वाटले की ह्या माणसाकडे कशी सरळ सोपी उत्तरं आहेत..माझ्या प्रश्नांची..

****मग मला आता इतक्या वर्षांनी का पडताळून पाहाव्या वाटल्या ह्या शक्यता?

********** कारण तुला आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेला void...सत्य म्हणाला.

अगं, जे मुळापासून उखडलेल झाड नसतं ना..ते जमिनीला भेगा पडून कुठे तरी डोकावण्याचा प्रयत्न करत राहत..अगदी तसेच..

***म्हणजे...कमाला कळेना...अगं, तूच म्हणतेस तसं, काही गोष्टी स्पष्ट असल्यातरी त्याची थेट अशी उत्तरं मिळेपर्यंत आपला शोध संपत नाही.. मला वाटत आता तो संपलाय..... आणि, हो..कधीकधी आपण आपली ideals आधी निश्चित करतो आणि मग त्यात बसवायला जातो आपल्या माणसाला. जसे तू केलेस..देवच्या बाबतीत. तूला आदिला पाहायचे होते देव मध्ये...his rough and tough attitude, त्याचा मनस्वीपणा, मूडी स्वभाव..म्हणून तुला देव पासून दूर जाऊन ही शक्यता अजमावीशी वाटली.

कला हमसाहमशी रडू लागली...तिला उमजले तिच्या आयुष्यात आता फक्त दोन पुरुष आहेत..एक शहाणपण शिकवून जाणारा सत्या आणि दुसरा...कायमच शहाणा असलेला...देव! आता बाहेर पाऊस सुरु झाला...पण हा पाऊस कलाला नेहमी पेक्षा वेगळा भासला...

शांत, तृप्त आणि समाधानी....


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles