कांचन धुरी....नुक्कडवर आगमन झाले आहे...आणि दिमाखात आगमन झाले आहे...किती तरल आहे ही गोष्ट...
विक्रम
बरोबरी - कांचन धुरी
'अरे बघ की जरा मागे'
त्याने मागे वळून पाहिलं न पहिल्या सारख करुन तो पुढे चालू लागला तिला आता बिलकुल चलावत नव्हतं… तरी ती पाय नुसते ओढत मागुन चालत होती.
त्याने तिला विचारल 'तू मागुन का चालते? बरोबर चाल ना माझ्या..' ती म्हणाली, 'अरे प्रत्येक वेळी बरोबरी करायची नसते रे..' तो म्हणाला, 'हा.. पण तू दमलीस हे कबूल करू नकोस..' ती म्हणाली,'बर बाबा दमले मी. आता घे माझा हात तुझ्या हातात..' तो म्हणाला, 'जा गं... मी का घेऊ हात हातात?' ती म्हणाली, 'अरे म्हणजे दोघ सोबत जाऊ ना रे..'
आणि ती दोघ बरोबर चालू लागली हसत हात हातात घेऊन…!!!!