Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

खरे-खोटे – सुचिता प्रसाद घोरपडे

$
0
0

तशी वरवर पाहता साधी सरळ आहे ही फिरस्ती.....पण तिच्या अंतरंगात डोकावून पहिले तर...दिसणारे सत्य आणि आंतरिक सत्य ह्यातला फरक जाणवतो...

विक्रम

खरे-खोटे – सुचिता प्रसाद घोरपडे

कोकणची ट्रीप नेहमीच एक वेगळा उत्साह आणते जीवनात.नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात काहीतरी वेगळे हवे असते ना आपल्याला.त्यामुळे ठरविले ह्यावेळी परत कोकणात ट्रीप काढायची.आणि सगळे मस्त मजा करीत निघालोही.चोहोबाजूंनी हिरवाईने नटलेली वनराई पाहून मन मोहरून जात होते.एकीकडे उंचच उंच डोंगर तर दुसरीकडे खोल खोल दरी.निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल्या सौंदर्यावर मन थरतच नव्हते.कधी इकडे तर कधी तिकडे मन धाव घेत होते.आणि कोकणच्या मेवाची तरच बातच निराळी.आता दुपार झाली होती त्यामुळे पोटात कावळे ओरडायले लागले होते.एक सुंदरसे हॉटेल पाहून जेवणास थांबलो.तिथे जेवण इतके मस्त होते की तृप्तीची ढेकर आली.सोलकढीने तर अमृताची सर आणली.जेवण संपलेच होते इतक्यात बाहेर गलबला ऎकू आला.हॉटेल रस्त्यावरच असल्याने तिथून रस्त्यावरचे सगळे नीट दिसत होते.त्यामुळे बसलेल्या ठिकाणाहून बाहेरचा गोंधळ ऎकू येत होता.

तिथे एक माणूस रस्त्यावर पडला होता व त्याचा छोटा मुलगा त्याला उठवीत होता.बहुधा तो प्यायलेला असावा, कारण त्या मुलाने त्याला उठविले की उठायचा आणि परत हेंदकाळून पडायचा. त्या मुलाची त्याला उचलायची केवीलवाणी धडपड चालू होती. ते पाहून मन हेलावत होते. आम्ही मदतीला उठणार तेवढयात काही माणसे त्या मुलाजवळ आली बहुधा त्यांना वाटत होते की हा दारूडा बाप दारू पिवून त्रास देत आहे त्या मुलाला. त्यामुळे ते त्या माणसाला थोडे ओरडून मारल्यासारखे करून उठवू लागले. तर तो छोटा मुलगा त्यांच्याच अंगावर धावून गेला व त्यांना दूर ढकलले. तोवर आम्ही सुध्दा त्याला समजावायला त्याच्या जवळ गेलो तर तो आम्हालाही ढकलू लागला, आम्ही त्यास खुप समजावयाचा प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ ठरले. तो खुपच ओरडू लागला त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तिथून निघावे लागले.

आता पुढचा सगळा प्रवास रटाळवाणा वाटू लागला.त्या मुलाचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता.आमच्या सगळ्यांचीच अशी अवस्था झाली होती.

परतताना त्याच रस्त्याने जायचे असल्याने आम्ही त्या हॉटेलमध्ये चौकशी केली.मग वेटरकडून कळाले की तो माणूस तेथील जवळच्याच वस्तीमध्ये रहातो व तो हमाली करतो,हात गाडी चालवितो.खुप कष्ट करतो आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी.त्याने त्याला एका शाळेतही घातले आहे.त्याच्यासाठी तो रात्रंदिवस काम करतो,त्याला त्याच्या देवाघरी गेलेल्या आईचीही कमतरता त्याने कधी भासू दिली नाही.त्या मुलाच्या सगळ्या इच्छा तो पुर्ण करतो.त्यासाठी तो राब राब राबतो, ओझी उचलतो.ऊन वारा पाऊस कशाचीच पर्वा करीत नाही. पण एवढी मेहनत केल्यामुळे त्याच्या शरीरात काही त्राणच उरत नाहीत,मग अंगाचे दुखणे त्याला असह्हाय करते,त्या वेदना त्याला सहनच होत नाहीत म्हणून तो कधी कधी रात्री दारू पितो. काल रात्री त्याला इतकी दारू कोणी पाजली नाही माहीत.

आता कळाले की तो छोटा मुलगा आपल्या वडीलांना का मारू देत नव्हता.रस्त्यावर पडल्यावर त्याचे वडील दारूडा बाप आहे असे जेव्हा सगळ्यांनी म्हटंले तेव्हा त्याला खुप वाईट वाटले असेल,कारण तेव्हा फक्त त्यालाच माहीत होते की त्याचा बाप दारूडा नाही तर त्याच्यासाठी झटणारा,काबाडकष्ट करणारा, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा त्याचा प्रेमळ बाप आहे.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles