कशी तडजोड केली जाते पहा...ह्या समजूतदारपणा म्हणायचा का आधुनिक जमान्यातला?
विक्रम
अडचण – डी.एम. कुलकर्णी
सान्निध्य मी कोणाला एकाला शोधत एका अपार्टमेन्ट मध्ये गेलेलो.या इमारतीच्या तळ मजल्या वरील एका फ्लॅटच्या दारात मला विजय अचानक खूप खूप म्हणजे 26 वर्षांनी भेटला. त्यापूर्वी 15 वर्षे आम्ही एकाच कारखान्यात सहकारी होतो.
आम्हाला त्या भेटीचा खूप आनंद झाला. चहापान, जुन्या आठवणी, चौकश्या, इकडच्या तिकडच्या गप्पा असा जवळजवळ दीड तास वेळ झाला. मी निघत होतो तर त्याने सांगितले
"आज भेटलो,पुन्हा कधी भेटू नाही सांगता येत. हा फ्लॅट विकून मी उद्याच नाशिकला फ्लॅट घेतलाय तेथे कायम साठी स्थलांतर करतोय."
मी म्हणालो "अरे दोघेच आहात पतीपत्नी तर या उतारवयात मुला-नातवंडात ठाण्याला का नाही जात? म्हातारपणी, नाशिकला, सर्वस्वी नव्या शहरात जाऊन सेटल होणे का सोपे आहे?”
तर तो म्हणाला
"अरे, मुला जवळ जायचे म्हणूनच तर नाशिकला जातोय, ठाणे- औरंगाबादच्या मानाने ठाणे-नासिक हे अंतर खूपच जवळ आहे. शिवाय त्याच्या संसारात आमची रोज ढवळाढवळ नको आणि भेटावं असं वाटलं सुटीच्या दिवशी अथवा अडी अडचणीला त्याला पटकन येऊन आम्हाला भेटून जाता येईल की! "