आज विजयाचे आगमन झाले आहे नुक्कडवर...तिच्या लेखणीतील धग घेऊन....
विक्रम
धग - विजया यादव
अश्वत्थामा चिरंतन भळभळणारी जखम घेऊन जसा दारोदार भटकत असतो तशीच ही अवस्था...
ती हातावरल्या सिगारेटच्या कोवळ्या चटक्यांकडे बघत राहिली...
शरीराभर जखमांचे व्रण...अन मनाचे काय?
होती नव्हती धग विझली...
शेवटी निर्णय घ्यावाच लागतो कधीतरी...
आज नाही तर कधीच नाही, म्हणत तिने कोरड्या डोळ्यांनी होमात नात्याची आहुती दिली व ती मागचा पुढचा विचार न करता तडक घराबाहेर पडली...