आसावरी म टा लेखन कार्यशाळेतील स्नेही...तिची कथा नात्याचे विभ्रम दाखवते आहे...आणि ही पिढी नात्यांचा किती खोलवर विचार करते...ह्याचे भान ती देते.. मला रिंगण आवड्लीच...खरे तर ती या अगोदर पोस्ट व्हायला हवी होती. उशीर झाला आहे.
रिंगण – आसावरी देशपांडे
तिनं त्याच्यात एक नातं शोधलं, आपसूकच त्या नात्याला नाव मिळालं, नात्यांची सुंदरशी गुंफण केली, आणि गुंफणाचे कधी रिंगण झाले कळलेच नाही, त्या रिंगणात डाव मांडला दोघांनी, रचला पाया प्रेमातल्या आणाभाका नी, सचोटीने ती खेळतच राहिली....
खेळता खेळता लक्षात आले नाते तर रिंगणाबाहेरच राहिले.....
काहीतरी बोचले,काहीतरी खुपले, तरीही येईल रिंगणात असे मानले.....
रिंगण आखून रिंगणाबाहेर राहणं त्याच्या अंगवळणीच पडलं, कित्येकदा तिला खटकलं पण काही नाही दाखवलं, आता ती पूर्वी सारखी धुमसत नाही राहिली, कालच्या कच्चा लिंबूची आज तरबेज गडी झाली.......
तिने पुन्हा त्याच्यात नातं शोधलं, आपसूकच त्या नात्याला नाव मिळालं,पण यावेळेस नात्यांची गुंफण झालीच नाही.....
तिच्यासाठी हे नातं एक निमित्तमात्र उरलं
तिच्याच रिंगणाच तिनं अवकाश तयार करण्याचं महाधनुष्य पेललं,
या आवकाशाची गंमतच न्यारी......
कारण रिंगणाने घेतली होती अथांगतेची भरारी
अन रिंगणाबाहेरच्या नात्याची पेटवली तिने होळी........