Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

मनाचा आरसा – नेहा लिमये

$
0
0

ही स्वार्थाची कीड जी ह्या देशाच्या मुळापर्यंत पोचली आहे..त्यानेच सर्व विनाश घडवला आहे...

विक्रम

मनाचा आरसा – नेहा लिमये

"कधीतरी केव्हातरी स्वतःशी प्रामाणिक राहावे माणसाने…तसे नेहेमीच राहावे, या दिखाऊ जगात अवघड आहे ते पण अशक्य मुळीच नाही ! आपल्या वरची राग, लोभ, द्वेष, अहंकार, असूया, माज इत्यादी कवच कुंडले काढून ठेऊन स्वतःमध्ये डोकावून बघा. मनाचा आरसा कधीच खोटे बोलत नाही याची प्रचीती येते. इतरांच्या मनातली आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आणि मग ती जपण्यासाठी स्वतःच्या गुणांची जाहिरात करणे थांबवा. त्यागमूर्ती चा अट्टाहास सोडून भोगमुर्ती आहोत हे मान्य करा. आयुष्य मोकळेपणाने जगायला एक दिलासा मिळतो.……"

"बुवांचं" प्रवचन रंगात आला होतं आज ! तेवढ्यात मागून एक शिष्य येउन कानात काहीतरी कुजबुजला.बुवांनी जमलेल्या समुदायाला ध्यान लावायला सांगितले. आणि ध्यानमंदिराच्या मागच्या खोलीत आले.

गावचे सरपंच येऊन थांबले होते. आश्रमाच्या जागेचा प्रश्न आज तरी सुटायला हवा …. इति मनात बुवा.

"हं बोला सरपंच, तुमच्यासाठी प्रवचन सोडून आलोय…एवढं काय महत्वाचं काम काढलंत ?"

"नाही म्हणजे…… ते काय आहे…. " सरपंच अडखळले

"तेच विचारतोय…बोला आता…. "

"ते हाय कमांड कडून आदेश आलाय…election आलं ना जवळ. तर तुमची मदत हवी होती जरा. म्हणजे, सविस्तरच बोलतो…तुम्हाला आश्रमाला जागा हवी न… ती दिली म्हणून समजा. फक्त तिथे एक शाळा चालवायची, एक छोटा दवाखाना उघडायचा आणि सगळ्याला आमचं नाव द्यायचं. शिवाय तुमची प्रवचनं चालू ठेवा एकीकडे. ध्यान मंदिरे वाढवा. काये, गावाचं नाव येऊ द्या कि नकाशावर….झळकू दे तुमच्या कृपेने !!"

"हम्म….त्या जागेचं ठीके. आम्ही काही उत्पादने काढावी म्हणतो आमच्या आयुर्वेदाच्या अभ्यासातून ! त्यासाठीचे factory टाकावी लागेल…. त्यासाठी ही जागा…परवाने तुम्ही मंजूर करून द्या. म्हणजे झालं."

"एवढंच होय…. करू की " - सरपंच

"ठीक आहे येतो आम्ही…. हाय कमांड न सांगा ….दर्शनाला येउन जा एकदा आणि तुम्ही ही येत जा अधून मधून "

"होय जी जरूर "

बुवा उठले आणि परत जागेवर येउन बसले. समोरचा जनसमुदाय ध्यानात मग्न होता. बुवांनीही मुद्रा स्थिर केली, डोळे मिटले…. आश्रम आणि factory मिळून सहज १० एकर जागा, factory मधून जवळ जवळ २०० कोटींचं उत्पन्न, शिवाय शाळा, दवाखाना आहेच.…ऱिघ लागेल लोकांची…पैशांच्या राशी पडतील पायाशी.……बरं झालं, आपल्याला आयत्या वेळी सुचलं factory चं बोलायचं. आता हा सगळा प्रपंच मांडलाय तो जनकल्याणासाठीच न ! त्यांचंच तर आहे सगळं…. फक्त जाता जाता आपलाही थोडसं बघितलं तर त्यात गैर काय ?? सरपंच थोडाच धुतल्या तांदळासारखा स्वछ आहे !!

खरचे बुवांचं …कधीतरी केव्हातरी स्वतःशी प्रामाणिक राहावे माणसाने.…. मनाचा आरसा खोटे बोलत नाही कधि…. नाही का ???


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>