हे हे हे ...असे लिहिले जाते म्हणून मला माझ्या लेखकांचा अभिमान वाटतो...क्या बात है...माणुसकीचा आणखी मोठ्ठा झरा कुठे शोधणार?
विक्रम
वडा पाव - संगीता गजानन वायचळ
दृश्य 1
ट्रेन मधे अचानक फरशांचे दोन तुकडे ठेक्यात वाजायला लागतात....... अचानक कोलांटया उड्या मारत छोटी मुलगी येते...... भाकरीच्या आकाराच्या लोखंडी रिंगमधून ती तिचं रबरासारखं अंग त्यातून सहजतेने काढ़ते ... अशाच आणखी दोन कसरती झाल्यावर ....तिचा हात डबाभर सगळ्यांसमोर फिरतो.... मोठया मुश्किलिने 10/20रुपये जमतात..... ............
दृश्य 2
थोड्यावेळाने आवाज येतो... ए भाय चल , भगवान तेरा भला करेगा , निकाल दस रुपये .... हिजडा दिसल्याबरोबर...डब्यातले अनेक हात पुढे येतात..... नोटांच जणू बंडल घेऊन ,पुढच्या स्टेशनवर तो उतरतो,.. ...... पाठोपाठ मी ही उतरते.... .........
दृश्य 3
त्या डोंबाऱ्याच्या मुलांना तो हिजडा सगळे पैसे देतो... आणि म्हणत असतो.... "मै हू तब तक डरने का नही.. जा ..उसका कमीशन दे के आ ... वडापाव खा ले पहले....."
संगीता गजानन वायचळ