एका सारख्या एक दोन घटना दोन ...प्रतिक्रिया..
विक्रम
कळा ज्या लागती जीवा - मयुरा गाडगीळ खरे
एकदा काय झालं एक बाई जगाच्या काळज्या वहात रस्त्याने फटफट स्लीपर घासत जात होती. समोरून एक भाजीवाला जगाच्या काळज्या वाहत खाली मान घालून ठेला ढकलत ढकलत येत होतां.
दोघांच लक्षच नव्हत...आदळले..!!
त्याला टेंगुळ आल, तिची पिशवी सांडली, दोघ चरफडले!!
तिचे पाय वेग धरत होते तर मन कार्ट्याने अभ्यास केला नसेल तर दणके देईन आज म्हणालं.
त्याचे पाय गुत्त्या कडे वळले..त्याच मन म्हणाल
"कोणीही येत लाथाडून जात, भोसाडीची काय जिंदगानी हाय!”