किती सुंदर आहे ही नुक्कड गोष्ट? मला अभिमान वाटतो...जेंव्हा असे काही वाचतो!!
विक्रम
आकाश – संगीता गजानन वायचळ
त्या दिवशी आकाशाचे डोळे मी सुजलेले पाहिले आणि एकाएकी काय झालं कुणास ठाऊक ते हुंदके देऊन देऊन रडायला लागलं कुशीत शिरायला कूस शोधायला लागलं... पण.. ती कूस नव्हतीच कुठे.
शेवटी खूप रडून झाल्यावर स्वतःच निळसर हास्य परत दाखवायला लागलं . फुलणाऱ्या चांदण्या, तळपणारा सूर्य, घोंगावणारा वारा, लहरणारे ढग, सगळयांना कुशीत घेऊन खेळवायला लागलं .........
आपल्याला कूस मिळाली नाही तरी आपण सगळयांची कूस व्हायचं त्यानं ठरवलं रडतारडता ... .......
तिनेही त्या