कमी अवकाशात बरेच काही....
संयम – अनुजा चाटूफळे
त्या दिवशी निरोप घेताना पाहिलं मी तुझ्या डोळ्यात. किती अंतरंग उलगडून दाखविले! किती किती ते रंग मनाच्या डोहात खोल दडवले होतेस. व्यक्त होणारे डोळे अव्यक्ततेचा बांध अश्रुंना घालत होते.... जणू काही अश्रुंचा शब्दांना अडथळाच झाला असता!!
........बरं झालं ना! संयम ठेवला डोळ्यांनी मनावर, नाहीतर माझ्या डोळ्यातल्या नौकेला वाहून जाण्यापासून मी वाचवू शकले नसते.